निवडणूक निरीक्षकांनी वाई विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची केली पहाणी

सातारा: निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी वाई विधानसभा मतदार संघातील शिरवळ, खंडाळा व नायगाव येथील मतदान केंद्रांची पाहणी केली.
केंद्रीय निवडणूक निरीक्षक सुरेंद झा यांनी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील आदर्श विद्यालयातील मतदान केंद्र क्र. 12, 13, 15 व 16 ची पहाणी करुन मतदान केंद्रनिहाय आढावा घेतला. नायगाव येथील मतदान केंद्र क्र. 86 व 87 ची पहाणी केली. तसेच खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देवून मतदान केंद्र क्र.114, 115, 116 व 117 ची पहाणी केली .
यावेळी श्री. झा यांनी मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांची पाहणी करुन मतदारांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या. तसेच दिव्यांग मतदारांना येण्यासाठी रॅम्प असल्याची खात्री केली. मतदान चिठ्ठी व नवीन मतदार ओळखपत्र वाटपाविषयी प्रत्येक बीएलओ चा आढावा घेऊन 100 टक्के वाटप पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.