Sunday, April 28, 2024
Homeठळक घडामोडीजीव धोक्यात घालून तरूणाई सरसावली वणवा विझवायला

जीव धोक्यात घालून तरूणाई सरसावली वणवा विझवायला

वाई: दिवसेंनदिवसउन्हाची धाहकता वाढत आहे. हिरवे गार डोंगर काही दिवसातच गवत वाळल्याने वाळून गेले. पशू, पक्षी अनेक दुर्मिळ वन्य जीवंाची अन्न, पाण्यासाठी वनवन चालू आहे. वाई तालुक्याच्या पश्‍चिमेला सहयाद्रीच्या डोंगर रांगा आहेत.
निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेल्या या डोंगररांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती, दुर्मिळ जीवन वास्तव्यास आहेत. पण काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीच्या गैरसमजूतीतून जाणीव पुर्वक या डोंगरांना अगी लावण्याचे प्रकार सर्‍हास होताना दिसत आहेत.
वनविभागाने दोेशींचा शोध घेवून त्यांना कठोर षिक्षा होताना दिसन नाही त्यामुळे या वणवा लावणार्‍या प्रवृत्तींचे फावताना दिसत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उससताना दिसत आहे.
वाई शहराच्या दक्षिण-उत्तर बाजूसही डोंगर आहेत. येथूनच पाचगणी, महाबळेश्‍वरला जाणारा पसरणी घाट आहे. सोमवारी दुपारनंतर पसरणी घाटावरीलसोनजाईच्या डोंगराला वणवा लागला. या डोंगरावर वारंवारवणवा लागत असतो. बगता-बगता सोशल मीडियावरूनही घटना सामाजिक संस्थांच्या गृपवरून फिरू लागली.
मग वाईतीलच प्रसाद सुळके, अनिल यादव, गणेश नेवसे, आषिश शिंदे, ॠशिकेश सरडे, विनय जमदाडे या तरूणांनी आपला जीव धोक्यात घालून कोणतीही सुरक्षा साधनेनसताना केवळ हिरव्या ढावळयांच्या सहयाने वणवा विझवायला सुरूवात केली.
वार्‍याचा जोेर, उंच वाळके गवत, वणव्याचा वाढता जोर या अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी वणवा विझवला व डोंगराचा काही भाग वाचविला. तरी वनविभागाने वणवा लावणारांवर त्वरीत कारवाही करावी अशी मागणी पर्यावरणप्रेंमीकडून जोर धरू लागला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular