वॉशिंग्टन : केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे अमेरिकी दौर्यात महत्त्वपूर्ण अशा पायाभूत क्षेत्रात अब्जावधींची गुंतवणूक होण्यासाठी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची मोहीम सुरू करणार आहेत. एका आठवड्याच्या अमेरिकी दौर्यावर असलेले गडकरी अमेरिकेबरोबर द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर चर्चा कणार आहे.
केंद्रीय मंत्री म्हणून गडकरी प्रथमच अमेरिकेला जात असून ते आठवडाभराचा कार्यक्रम भरगच्च आहे. वॉशिंग्टनपासून ते लॉस एंजलिसदरम्यान न्यूयॉर्क, सेंट लुईस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अधिकार्यांच्या मते गडकरी अमेरिकेचे परिवहन मंत्री अँटनी फॉक्स यांच्यासमवेत 11 जुलै रोजी चर्चा करणार आहेत. पायाभूत सुविधेत गुंतवणुक वाढविण्याबरोबरच उभय देशातील संबंध अधिक वृद्धींगत होण्यासाठी अमेरिकेच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. अमेरिकी परिवहन विभागात गडकरी फेडरल हायवे ऍडमिनिस्ट्रेशन, यूएस मेरिटाइम ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनचे सादरीकरण पाहणार आहेत. वॉशिंग्टन येथील थिंक टँक अटलाटिंक कौन्सिलकडून भारताचा पायाभूत विकास: एक संधी यावर आयोजित एका कार्यक्रमात गडकरी सहभाग घेणार आहेत. यूएस-इंडिया कौन्सिलकडून आयोजित कार्यक्रमात गडकरी हे गुंतवणुकदारांना आणि पायाभूत सुविधा देणार्या कंपन्यांना पोर्ट, इनलँड वॉटरवेज, हायवे डेव्हलपमेंटबाबत सादरीकरण करणार आहेत. अधिकार्यांच्या मते, गडकरी पायाभूत क्षेत्रात 50 ते 60 अब्ज डॉलर आणि बंदर परिसरातील आर्थिक क्षेत्रात 100 अब्ज डॉलर गुंतवणुक करण्यासंदर्भात आवाहन करणार आहेत. इनलँड वॉटरवेज, वॉटर ट्रान्सपोर्ट, कोस्टल आणि क्रुझ शिपिंप, सोलर आणि एनर्जी जनरेशनमध्येही गुंतवणूक करण्याची योजना केली आहे