Friday, March 28, 2025
Homeकरमणूकलिटिल मास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव

लिटिल मास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10 हजार धावांचा पल्ला पार करणारे भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्यावर 66 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक खेळाडूंनी या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा देताना त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
तेंडुलकरने आपल्या ट्वीटर हँडलवर लिहिले की, महान सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वर्षोनुवर्ष मला प्रेरीत केल्याबद्दल तुमचे आभार. त्याचवेळी विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणार माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवानने आपल्या स्टाइलने गावसकर यांना शुभेच्छा देताना सांगितले की, गावसकर यांनी बिनाहेल्मेट घालून जो पराक्रम केला आहे, तो आत्ता पुर्ण संरक्षण साधने वापरुन करणेही कठीण आहे. जर क्रिकेट एक चित्रपट आहे, तर गावसकर त्यातील जोश आहे.
सेहवागने सुरुवातीला गावसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले की,  सर्वकालीन महान फलंदाजांपैकी असलेल्या सन्नी पाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठ्या आणि स्वस्थ जीवनासाठी आपल्याला शुभेच्छा.  गावसकर यांनी सर्वप्रथम 10 हजार धावा काढताना 30 शतके झळकावण्याचा पहिला फलंदाज असा मान मिळवला. तसेच पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम अजूनही गावसकर यांच्या नावावर कायम आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी क्रिकेटविश्वावर वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांची दहशत होती त्याकाळामध्ये गावसकर यांनी हे विक्रम केले.
त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गावसकर यांना जिब्राल्टरचे पठार असे संबोधले. बोर्डने ट्वीट केले की, ह्यह्यमहान खेळाडू, भारताचे जिब्राल्टरचे पठार सुनील गावसकर यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.ह्णह्ण गावसकर यांनी 1971 ते 1987 दरम्यान, भारताकडून 125 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी 51.12 च्या शानदार सरासरीने 10,122 धावा काढल्या आहेत. तसेच 108 एकदिवसीय सामने खेळताना 35.13च्या सरासरीने 3092 धावा फटकावल्या आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular