हलगर्जीपणा युवकाच्या जीवावर बेतला
सातारा : आकाशवाणी झोपडपट्टी येथील युवक आकाश विजय विभुते (वय 21) याच्या मृत्यू प्रकरणी टेम्पो चालकास शाहुपूरी पोलिसांनी अटक केली आहे. याची फिर्याद प्रसाद विभुते यांनी दिली आहे. तर अविनाश पवार (रा. पंताचा गोट) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि. 31 ऑगस्ट रात्री 10 वाजता आकाशवाणी रोडवर गणेश मंडळासाठी लागणे पत्र असलेला टेम्पो थाबला होता. त्या टेम्पोतून पत्र्याचा अर्धा भाग बाहेर आला होता. दरम्यान, यावेळी आकाश विभुते हा दुचाकीवरुन येत असताना रस्त्यावरील टेम्पो न दिसल्याने तो टेम्पोला धडकला त्यावेळी टेम्पोतील पत्रा आकाशच्या गळ्याला लागल्याने आकाश जागेवरच कोसळला. तेथील नागरिकांनी तत्काळ त्याला जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. मात्र आकाशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान शाहुपूरी पोलिस ठाण्यात हलगर्जीपणा टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे.