महाबळेश्वर : नगर पालिकांच्या निवडणुका जवळ आल्या असुन शिवसैनिकांनी जिल्हयातील सर्व पालिकांवर भगवा फडकविण्या साठी आता पासुनच कामाला लागा असा आदेश देवुन शिवसेनेचे सातारा व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी येथे आयोजित केलेल्या शिवसंवाद मेळाव्यात बोलताना शिवसेेना या पुढील सर्व निवडणुका अधिकृत पक्षाच्या चिन्हावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे युवा सेनेचे रणजित भोसले हे उपस्थित होते.
शिवसेनेच्या सवुर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन पक्षाच्या वतीने तालुका निहाय शिवसंवाद मेळाव्यांचे आयोजन केले होते. या मेळाव्यांची जिल्हयातील सांगता येथील पालिका सभागृहात आयोजित केलेल्या मेळव्यात करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या महीला प्रमुख शारदा जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, तालुका प्रमुख यशवंत घाडगे, जेष्ठ नेते धोंडीराम बापु जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प. महाराष्ट्राने शिवसेनेच्या पदरात काही टाकले नाही, परंतु उर्वरित महाराष्ट्ाच्या तुलनेत शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामासाठी निधीची तरतुद केली आहे. युतीचा साडेचार वर्षांचा काळ वगळता राज्यावर कॉग्रेसनेच राज्य केले. तरीही आज अनेक गावाला रस्ता नाही, विज नाही , तर पिण्यासाठी मुबलक पाणी नाही. शिक्षणाचीही बोंबाबोंब आहे. अशा कारभाराचा नाकर्त्या कॉग्रेसला कोणी जाब विचारत नाही. अर्थात हा त्यांचा दोष ,त्यांना पुन्हा पुन्हा निवडुन देतात त्यांचा दोष आहे. आता लोक शिवसेनेकडे मोठया प्रमाणावर आकर्षित होत आहेत. हे काग्रेस व राष्ट्रवादीचे अपयश आहे. लोकांना आता केवळ शिवसनेने कडुनच अपेक्षा आहेत. या संधीचा लाभ घ्या. शिवसेना घरा घरात पोहचवा. शिवसेनेने केलेली कामे त्यांना सांगा. प्रत्येक वेळी आंदोलनासाठी हात उचलता, आता केलेली कामे सांगण्यासाठी जीभ उचला. सातारा सांगली मध्ये अजुनही शिवसैनिक तक्रार करतात. अधिकारी आमची कामे करीत नाहीत. तक्रार कसली करता, तुम्ही वाघ आहात. त्यांना प्रथम समजावुन सांगा, नाही ऐकलेतर तुमची नखे त्यांना दाखवा..त्या शिवाय ते ताळयावर येणार नाहीत. अधिकारी यांनाही माझे सांगणे आहे की, तुम्ही केवळ एका पक्षाची तळी उचलु नका, नाहीतर शिवसेना तुमची तळी उचलल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी या मेळाव्यात बोलताना दिला.ते म्हणाले की, शिवजल शिवार ही योजना आमची असल्याचे कॉगेसवाले सांगतात, मग तुमच्या वेळी या योजनांमध्ये तुम्ही पाणी का अडविले नाही. आताच कसे व कोठुन पाणी आले. कॉग्रेस आघाडीने केवळ भ्रष्टाचार केला.म्हणुनच त्यांची विकास कामे गेली. पंधरा पंधरा वर्षे पुर्ण होवु शकली नाही महु हातेघर धरणाचे काम. युती शासनाने सुरू केले त्याच काळात 70 ते 75 टक्के काम पुर्ण उर्वरित 30 ते 25 टक्के काम पंधरा वर्षात पुर्ण झाले नाही. आता ते काम पुर्ण करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे. शिवजल क्रांती प्रमाणेच शिवप्रकाश योजना, शिवटेलीमेडीसिन योजना राज्यात सुरू करण्यात येत आहेत. महाबळेश्वरसाठी शिवटेलीमेडीसिन योजना सुरू करण्यासाठी शिवसेना प्रक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. अशी माहीतीही प्रा बानुगडे पाटील यांनी दिली. शिवसेनेकडुन विरोधकांना समितीवर नेमले जात असल्याची तक्रार काही शिवसैनिकांनी केली. तो धागा पकडुन ते म्हणाले की, जो काम करणार असेल त्यालाच पद मिळणार, जो निष्ठावंत आहे त्याचीच वर्णी समितीवर लागणार. विरोधी पक्षाचे काम व पद शिवसेनेकडुन असे हाणार नाही जो भगवा खांदयावर घेत नाही त्याला कोणतेच पद मिळणार नाही. अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली. जिल्हयात महाबळेश्वर तालुक्यात जेवढी शिवसेना मजबुत आहे. तेवढी इतर तालुक्यात नाही. येथे 90 टक्के गावात शिवसेनेच्या शाखा आहेत आता शिवसैनिक तालुक्यातील दोन्ही पालिका, पंचायत समिती व जिल्हा परीषदेच्या दोन्ही जागा जिंकुन संपुर्ण तालुक्यावर भगवा फडकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही याची मला खात्री आहे असे प्रतिपादन प्रा बानुगडे पाटील यांनी केले.
पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे : प्रा. बानुगडे पाटील
RELATED ARTICLES