साताराः आज देशात राबवत असलेले अर्थिक धोरण औद्योगिक विकासाला चालना देणारे आहे. होत असलेल्या अर्थिक बदलाचा परिणाम काही प्रमाणावर होणार, पण त्याकडे न पाहता भविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.तसेच भविष्यावतील अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने प्रत्येकी 2 हुशार इंजिनिअर निवडून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले पाहीजे. ज्यामुळे त्यांची इस्त्रो सारख्या मोठ्या संस्थात निवड झघली पाहीजे व ही सामजिक बांधिलकी उद्येागांनी घ्यावी. मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ साताराचे काम कौतुकास्पद असून नवे उद्योजक कसे तयार होतील? याकडे संस्थेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन फोर्स कंपनीचे प्रमुख , ज्येष्ठ उद्योगपती व विचारवंत डॉ.अभयशेठ फिरोदिया यांनी केले.
मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व.झंकारमलजी मुथा यांचे स्मृती प्रित्यर्थ सातारा येथील औद्योगीक वसाहतीत असणार्या मास भवनाच्या विस्तारित इमारतीत मुथा ग्रुपचे चेअरमन अजित मुथा यांच्या सौजन्याने नव्याने निर्माण केलेल्या स्व.झंकारमलजी मुथा सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी ऑफिसर्सं क्लब येथे डॉ. फिरोदिया याच्या व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कूपर उद्योग समुहाचे प्रमुख संचालक फारुख कूपर,मुथा उद्योग समुहाचे प्रमुख अजित शेठ मुथा, मासचे अध्यक्ष राजेश कोरपे,अजित बारटक्के, धैर्यशील भोसले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ.अभयशेठ फिरोदिया पुढे म्हणाले की,मुथांची कन्या ही फिरोदियांची सून आहे. मुथांनी आग्रहाचे निमंत्रण दिल्याने या कार्यक्रमाला येणे आपल्याला क्रमप्राप्त होते. मुथा व फिरोदियांचे संबंध जूने आहेत. आम्हाला दोघांच्या आजोबांचे जैन समाजात महत्वाचे स्थान होते.
स्वातंत्र्यानंतर त्यावेळच्या सरकारच्या धोरणामुळे देशाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही, विकास खुंटला होता. .स्वातंत्र्यापुर्वी स्वातंत्र्य लढ्यात सरदार पटेल, लोकमान्य टळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीशांचा देशाचे तुकडे करण्याचा व समाजात भांडणे लावण्याचा दुष्ट हेतु साध्य होवू दिला नाही. त्यामुळे आज आपल्या देशात सर्व समाजाचे लोक बंधुभावाने व त्यांच्या परंपरासह रहात आहेत.
उद्योजकांनी भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे पाहून आपल्या उद्योगाची वाटचाल केली पाहिजे. सध्याची अर्थिक स्थिती पाहता भविष्यात येणार्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, असेही फिरोदीया यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करुन जीएसटीसाखे टॅक्स देशात लागू केले आहेत. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली आर्थिक स्थिती बदलण्याचा महत्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला आहे.यामुळे कर बुडविणार्याना व कर कमी भरत आले त्यांना त्रास होणार, हे निश्चित, असे फिरोदिया यांनी स्पष्ट केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुपर कॉर्पोरेशनचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर फरोख कुपर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजाच्या विविध उपक्रमात मुथा परिवाराचे योगदान मोलाचे असल्याचे मत व्यकत केले. मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन अजित मुथा यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ साताराचे अध्यक्ष राजेश कोरपे यांनी प्रास्ताविक केले व मासच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष अजित बारटक्के यांनी आभार मानले.सुत्र संचालन धैर्यशील भोसले यांनी केले.
समारंभास मुथा परिवारातील सदस्य अभयशेठ मुथा, अनुप शेठ मुथा, जयदिप बाफना, सौ. मीना मुथा,सौ.रिचा मुथा, सुजीत मुथा, बाळासाहेब जाजू. मासचे सचीव धैर्यशील भोसले, सातारा येथील मासचे आजी माजी प्रतिनिधी,उद्योजक व विविध क्षेत्रतातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांचे हस्ते परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले.
भविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया ; मास भवनातील स्व.झंकारमलजी मुथा सभागृहाचे उदघाटन संपन्न
RELATED ARTICLES