कोरेगावची पाणी समस्या कायमस्वरुपी संपुष्टात आणणार : आ. शशिकांत शिंदे

कोरेगाव : वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण पाहता शहराला पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते, आता नव्याने रेल्वे स्टेशन पाणी पुरवठा योजनेची नव्याने उभारणी केली जात असल्याने शहराची पाणी समस्या कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ाष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
कोरेगाव शहराच्या निम्या भागाला पाणी पुरवठा करणार्‍या रेल्वे स्टेशन पाणी पुरवठा योजनेची नव्याने उभारणी केली जात असून, त्या कामाचा शुभारंभ आ. शिंदे यांच्यासह नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार,  नगरसेवक संजय पिसाळ, बच्चूशेठ ओसवाल, महेश बर्गे, शिवाजीराव साळुंखे, रामभाऊ बर्गे, हिंदुराव कळसे, गजानन बर्गे, प्रतिभा बर्गे, दिलीप बर्गे, सचिन बर्गे, डॉ. गणेश होळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरेगाव शहराची पाणी समस्या सोडविण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार आता पाणी पुरवठ्याच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. रेल्वे स्टेशन पाणी पुरवठा योजना ही 1972 साली अस्तित्वात आली होती, अनेक वर्षे सेवा दिल्यानंतर ती मोडकळीस आली होती, तिचा विस्तार करण्याबरोबरच आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यास जलदगतीने मान्यता मिळाल्याने आता पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी संपुष्टात येणार असून, कोरेगावकरांसाठी ती आनंदाची बाब असल्याचे आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
राजाभाऊ बर्गे यांनी पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आलेली असून, जलशुध्दीकरण प्रक्रिया देखील उच्चदर्जाची केली जात असल्याचे सांगितले. उन्हाळ्यापूर्वी शहराला मुबलक व शुध्द पाणी देण्याची आमची जबाबदारी असून, आम्ही प्रत्येक प्रभागात मुबलक पाणी देणार आहोत, त्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे बळकटीकरण केले जात आहे.
प्रतिभा बर्गे व डॉ. गणेश होळ यांनी शहरातील पाणी पुरवठ्याबाबत मनोगत व्यक्त केले. सचिन बर्गे यांनी स्वागत केले. राजेश बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक राजेंद्र बर्गे, नागेश कांबळे,  नगरसेविका सौ. संगीता बर्गे, सौ. मंदा बर्गे, सौ. शुभांगी बर्गे, सौ. साक्षी बर्गे, सौ. रेश्मा जाधव, सौ. शोभा येवले, सौ. सुलोचना फडतरे, सौ. पूनम मेरुकर, नवनाथ बर्गे, सुनील बर्गे, राहूल र. बर्गे, अमरसिंह बर्गे, गणेश धनावडे, दीपक फडतरे, महादेव जाधव, अमोल मेरुकर, गणेश येवले सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, अजिज पठाण, विनोद गोरे, अजित पवार, प्रकाश ता. बर्गे, संजय पवार, सुनील पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.