Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथे खून झालेल्या युवकाची ओळख पटली ; सचिन ठाकुर पिंपरी...

फलटण येथे खून झालेल्या युवकाची ओळख पटली ; सचिन ठाकुर पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी येथील रहिवाशी

deफलटण  : फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी गावाच्या नजीक नाईकबोमवाडी-तातमगिरी या रस्त्याच्या बाजुला एका 20 ते 25 वर्षीय अज्ञात युवकाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती.सदरची घटनेची माहिती सर्व ठाण्यात कळविल्यानंतर हा युवक पिंपरी चिंचवड च्या काळेवाडी येथील असुन त्याचे नाव सचिन ठाकुर असे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपरी चिंचवड च्या काळेवाडी परिसरातील  सराईत गुन्हेगार असलेल्या सचिन ठाकुर यास फलटण येथे घेऊन जावून नाईकबोंबवाडी गावच्या हद्दीत चार जणांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन विश्वनाथ ठाकूर (19, काळेवाडी) असे हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.याप्रंकरणी वैभव नागस्कर, प्रशांत दिगे, संतोष उर्फ बंड्या सगर, प्रकाश हिराचंद ओंबासे (रा. राहाटणी)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांनुसार, प्रकाश ओंबासे याची फलटण कोर्टात तारीख होती.सचिन ठाकूर व अन्य साथिदार प्रकाश बरोबर गेले होते.नाईकबोंबवाडी गावच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला.चारजणांनी सचिनच्या डोक्यात दगड घालून निर्घुन हत्या केली.त्यानंतर चारहीजण फरार झाले.सोमवारी रात्री सातारा गुन्हेशाखेचे पोलिस काळेवाडी, राहाटणी येथे चौकशीसाठी आले होते.पिंपरी-चिंचवडमध्ये सचिन ठाकूर याच्या विरोधात 17 गुन्हे दाखल असून त्यामध्ये दोन हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे.चारजणांनी सचिनची हत्या का केली.या खूनप्रकरणी पुणे येथील एका संशयित आरोपीला वाकड पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले आहे.
सचिन याचा खून का व कशासाठी केला याबाबत वाकड (पुणे) व फलटण (ग्रामीण) चे पोलिस अधिक तपास करीत आहेत. जुन्या भांडणातून हा खून झाला असेल असे मत पोलिसांकडून व्यक्त होत असून, सचिन याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक फलटण येथे येऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पिंपरी चिंचवडला अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले आहेत
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular