पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे महाराष्ट्रात
पावसाचा कमबॅक होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात पाऊस पडणार असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असंही वेधशाळेनं म्हटलं.
उद्यापासूनच पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती कृषी हवामान विभागाचे संचालक डॉ. एन. चटोपाध्याय यांनी दिली.