सातारा : सातारा सर्कीट हाऊस येथे विविध विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत पोवई येथे होणार्या उड्डाण पूलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. यावेळी या उड्डाण पूलाच्या कामाच्या कामाचे स्लाईड शो द्वारे माहिती घेण्यात आली. शुक्रवार दि. 17 मार्चपासून सातारा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करुन राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले रस्ते, पूल, साकव यांची माहिती अधिकार्यांच्याकडून घेवून त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
आज झालेल्या आढावा बैठकीस नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, जि. प. सदस्य रेश्माताई शिंदे, सौ. अनिता चोरगे, संदीपभाऊ शिंदे, समृध्दी जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. माने, सातारा नपाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
(छाया : प्रमोद इंगळे, सातारा)