सातारा : येथील राधिका चौकामध्ये राधिका टॉकीजच्या लगत असलेल्या रस्त्यातच धान्याने भरून निघालेला ट्रक अडकला. पाण्याची गळती होत असल्याने या ठिकाणी खडडा खोदण्यात आला होता. पलिकेने पाण्याची पाईपीचा लिकिज काढण्यासाठी या ठिकाणी खडडा खोदला होता. नळाचे लिकिज काढल्यानंतर तो लिकीज काढून त्यावर मुरमाची मलमपट्टी केली.
मंगळवारी दुपारच्या 2 च्या सुमारास बसस्थानकाकडुन राजवाडा परिसराकडे धान्याने भरून निघालेला ट्रक रधिकारोड येथील चौकातच अडकला. ट्रक मध्ये धान्याची पोती असल्याने ट्रक मध्ये जास्तच बोजा होता. पालिकेच्या कर्मचाऱयांनी पाईपला लागलेली गळती काढण्यासाठी याठिकाणी खडडा खोदला होता. खोदलेल्या खडडयात मुरूम टाकण्यात आला होता. परंतु ही जागा ओलसर असल्याने ट्रकचे चाक खडडयातच रूतन बसल्याने ट्रक अडकून ट्रकचे आर्धे चाक या खडडयातच रूतुन बसले. ट्रक मध्ये लोड असल्याने ट्रक मधील धान्याची पोती खाली करून नागरीकांच्या साहयाने ट्रकला ढकलुन काढण्यात आला. अनेक वाहन धारकांना या खडडयामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या खडयामुळे छोटे मोठे अपघात घडू शकतात. परीसरातील नागरिकांनी खडडे भरून काढण्याची मागणी करत आहेत.
पालिकेच्या गचाळ कारभारामुळे वाहनधारकांची डोकेदुखी
RELATED ARTICLES