Saturday, March 22, 2025
HomeUncategorizedफलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणार्‍या विज कनेक्शन जोडण्यास विलंब होत असल्याने ग्राहक...

फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणार्‍या विज कनेक्शन जोडण्यास विलंब होत असल्याने ग्राहक वैतागले 

फलटण : गेली 5 ते 6 महिन्यापासून विज मीटर शिल्लक नसलेमुळे विज कनेक्शन जोडण्यात विलंब होत असल्यामुळे तसेच प्रलंबित यादीनुसार विज जोडणी दिली जात नसलेमुळे फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणार्‍या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण अधिकारी यांच्याकडून कुत्रीम विज मिटरची टंचाई होत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.
महावितरण कंपनीस यापूर्वी विज मिटर पुरवठा करणार्‍या कंपनीच्या नवीन मीटर मध्ये अनेक दोष निर्माण होऊ लागले जसे की विज जोडणी दिल्यानंतर काही दिवसात  डिस्प्ले न दिसणे, विज वापरा पेक्षा जास्त रिडीग, विज वापरा पेक्षा कमी रिडीग, मीटर बंद पडणे असे अनेक दोष मीटर मध्ये दिसू लागल्यानंतर महावितरण कंपनीने असे मीटर त्या मीटर पुरवठा करणार्‍या कंपनीला परत केले परंतु मीटर परत करते वेळी नवीन विज उजोडणीसाठी येणार्‍या अर्जाचा विचार केला नाही. त्यामुळे 5 ते 6 महिन्यापासून नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या हजारो ग्राहकांना विज मीटर नसल्यामुळे विज जोडणीपासून वंचित रहावे लागत आहे, काही प्रमाणांत नवीन विज मिटरचा पुरवठा होत असून महावितरण कंपनीस होणारा विज मीटर पुरवठा हा प्रलंबित विज जोडणी व नवीन विज जोडणीच्या मागणीपेक्षाही फारच प्रमाणात कमी आहे, याचाच फायदा महावितरण अधिकारी उचलत आहेत. एकीकडे नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त 24 तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला पण त्यांची अंमलबजावणी महावितरणच्या फलटण विभागीय कार्यालयाकडून होताना दिसत नाही.
अनेक महिन्यापासून विज मीटरची वाट पाहणार्‍या अनेक नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारूनही एकच उत्तर मिळत आहे की मीटर शिल्लक नाहीत, मिटर आल्यावर विज जोडणी दिली जाईल असे उत्तर दिले जाते परंतु दुसरीकडे निवडक मर्जीतील ग्राहकांना तत्काळ विज मीटर जोडणी मिळत आहेत. अनेक ग्राहकांची दिवाळी अंधारात गेली असून, प्रलंबित यादी प्रमाणे विज मिटर जोडणी न देता कामात अनियमतता करत वरिष्टाच्या मर्जीतील काही ग्राहकांना विज जोडणी दिली गेली आहे, यामध्ये महावितरण बारामती परिमंडळचे मुख्य अभियंता नागनाथ ईरवाडकर, सातारा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता संजय साळी, महावितरण विभागीय कार्यालय फलटण कार्यकारी अभियंता राजदीप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता कुलकर्णी व यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालतील अधिकारी वर्गाची भूमिका काय आहे हे कळत नाही. सर्व उपविभागातील शाखा कार्यालयात महावितरणचे नियम डावलून विज जोडणी दिल्याची बाब समोर येत आहे. नियमबाह्य विज मिटर जोडणी प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रलंबित विज जोडणी ग्राहकामधून होत आहे. नवीन विज जोडणीचे पैसे भरूनही नागरिकांना अंधारात बसण्याची वेळ येत आहे.संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालयात हीच परिस्थिती असण्याची दाट शक्यता आहे.
          महावितरण फलटण विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मर्जीने अनेक शाखा अभियंते आर्थिक भ्रष्टाचार करत विज जोडणी प्रलंबित यादी प्रमाणे विज जोडणी न देता स्वतःच्या मर्जीने मनमानीपणे देत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करण्याची तसेच जबाबदार अधिकारी यांचेवर कडक कारवाईची करण्याची मागणी प्रलंबित वीज ग्राहकांकडून होत आहे. सदर या नियमबाह्य कामात विभागीय कार्यालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी यांची कोणत्या लाभापोटी मूक संमती आहे यांचा बोध होत नाही. महावितरणने मागील 5 ते 6 महिन्यातील एकूण प्रलंबित यादी व त्यांपैकी दिली गेलेली वीज जोडणी यांची यादी संपूर्ण तपशीलवार जाहीर करावी. नियमबाह्य विज जोडणीबाबत जबाबदार महावितरण अधिकार्‍यावरती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय कारवाई करणार, थकीत वीज बिल वसुलीसाठी कडक भूमिका घेणारे ऊर्जामंत्री या प्रकरणात कडक भूमिका घेणार की काय यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular