Saturday, April 20, 2024
Homeठळक घडामोडीसाहित्य संमेलनाने पाटण नगरी दुमदुमणार ; दि. 2 व 3 फेब्रुवारीला साहित्य...

साहित्य संमेलनाने पाटण नगरी दुमदुमणार ; दि. 2 व 3 फेब्रुवारीला साहित्य संमेलनाचे आयोजन

पाटण दि. 14  स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षीही दोन व तीन फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. संयोजन समितीची नुकतीच बैठक पाटण येथे संमेलनाचे कार्याध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या संयोजक समिती बैठकीत विविध साहित्य कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. त्यानुसार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी भव्य ग्रंथदिंडी यामध्ये विविध शाळा, महाविद्यालये, बालवाड्यांचे चित्ररथ सहभागी होतील. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे व व्यासपीठाचे उद्घाटन व संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. दुपारच्या सत्रात तमाशा कलावंत मंगला बनसोडे  ( करवडीकर ) यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पाटण तालुक्याच्यावतीने भव्य नागरी सत्कार व त्यांची प्रकट मुलाखत व त्यानंतर कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवीसंमेलनात सहभाग घेणार्‍या कवींनी आपल्या कवीता प्रा. सौ. विजयमाला म्हासुर्णेकर यांचेकडे पाठवायच्या आहेत.
शनिवार दि. 3 रोजी सकाळी स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्याविषयी व्याख्यान त्यानंतर मृत्युंजय या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सागर देशपांडे यांचे विवेचन व दुपारच्या सत्रात कथाकथन व संमेलनाचा समारोप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले.
या बैठकीला जेष्ठ पत्रकार ए. व्ही. देशपांडे, बाळासाहेब पवार, शंकर मोहिते, अनिल बोधे, राजेंद्र कांबळे, दादासाहेब कदम, विजय ताटे, विकास संकपाळ, प्रा. सौ. विजयमाला म्हासुर्णेकर, डाॅ. सौ. विद्या पाटील, सौ. विणा नांगरे, सौ. अर्चना देशमुख,विद्या म्हासुर्णेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular