रिओ दी जानेरो : भारताची सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीने रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या मिश्र दुहेरीत ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरे आणि हिथर वॉटसनला 6-4 , 6-4 अश्या सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरी धडक मारली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सानिया आणि रोहन आपले पदक निश्चित करण्यापासून फक्त एक पाऊल मागे आहे. उत्तम समन्वयांमुळेच सानिया आणि रोहनला ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरे आणि हिथर वॉटसनला नमवणे सहज झाले.
सानिया आणि रोहन आता पदकापासून फक्त एक पाऊल मागे असल्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या आशा या जोडीवर आहेत. रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सॅम आणि जोनाथन या जोडीचा 7-5, 6-4 असा पराभव केला होता. सानियाचे यंदाचे ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागाचे तिसरे वर्षे आहे. सानिया आणि रोहन याआधी अनेक वर्षे एकत्र खेळले आहेत. त्यांनी हॉपमन चषकातही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आठ-नऊ वर्षे एकत्र खेळताना हे दोघे अपराजित राहीले होते यामुळेच बहुदा त्यांना आजच्या सामन्यात सहज विजयी मिळवता आला.