Friday, March 28, 2025
Homeवाचनीयआरोग्य विषयकसातारा डायग्नोस्टीक सेंटर येथे जन्मजात हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वी

सातारा डायग्नोस्टीक सेंटर येथे जन्मजात हृदयविकाराची शस्त्रक्रिया यशस्वी

सातारा- जन्मजात हदयविकारांपैकी सर्व साधारपणे आढळणारा ए.एस.डी आणि व्ही.एस.डी हा आजार म्हणजेच हृदयाच्या कप्यामधील  अनैसर्गिक छिद्र असल्यामुळे किंवा आंतरपडद्यामध्ये छिद्र असल्यामुळे हृदयातील शुद्ध व अशुद्ध रक्त हदयाच्या स्पंदनाबरोबर एकत्र मिसळले जाते व या जन्मजात दोषामुळे रुग्णाला दम लागणे,वारंवार जंतू संसर्ग होणे शरीराची व मेंदूची वाढ नीट न होणे व योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीवावर बेतण्यासारखा प्रसंग उदभवू शकतो. यापूर्वी या आजारातील उपचार म्हणजे ह्दयशस्त्रक्रिया करून या प्रकारचे व्यंग दुरुस्त करणे ही शस्त्रक्रिया मेजर शस्त्रक्रिया समजली जाते. अत्यंत खर्चिक व गुंतागुंत निर्माण करू शकणारी शस्त्रक्रिया म्हणून याकडे पाहिले जाते. पुण्यामुंबई सारख्या मोठ्या शहरात या शस्त्रक्रिया होत असल्यामुळे गावोगावी असणार्‍या रुग्णांना कोणत्याच दृष्टीने न पखडणारी शस्त्रक्रिया म्हणून अनेक रुग्ण आजपर्यंत उपचाराकरिता वंचित राहत होते.
प्रगत तंत्रज्ञानाच्या साहय्याने ओपन हार्ट सर्जरी टाळून ज्याप्रमाणे अ‍ॅन्जीओग्राफी करतो अश्या  प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या साहयाने केवळ अर्ध्या तासात शरीरावर कोणताही मोठा छेद न देता विशिष्ट प्रकारचा कृत्रिम पडदा (उश्रेीशी ऊर्शींळलश) वापरून अशा प्रकारचे हृदयातील जन्मजात व्यंग (डशिींरश्र ऊशषशलीं) दुरुस्त केले जाते व रुग्ण बरा होवून सर्वसामान्य जीवन व्यतित करू शकतो. विसाव्या शतकातील ही एक अदभूत अन मौल्यवान अशी उपलब्धी आहे.
सातारा डायग्नोस्टीक सेंटर  येथे नुकतीच अश्या प्रकारची (डऊ) ही हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
सातारा डायग्नोस्टीक सेंटरचे डॉ. मधूसुधन आसावा हृदयरोगतज्ञ यांनी डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
आजपर्यंत 50 पेक्षा जास्त बायपास सर्जरी शेकडो अ‍ॅन्जीओग्राफी व अ‍ॅन्जीओप्लास्टी तसेच अनेक व्हॉल्व रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आत्मविश्वासाने पार पाडून एका नवीन क्षेत्रामध्ये हॉस्पिटलने पदार्पण केले आहे. हे एक उत्तम टीम वर्क असून तज्ञ डॉक्टर्स,तत्पर कर्मचारी वर्ग, उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा ही अल्पदरामध्ये सातार्‍यात अहोरात्र उपलब्ध झाली आहे. सातारा हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टरचे चेअरमन डॉ. सुरेश शिंदे यांनी असे आवाहन केले आहे कि अश्या प्रकारच्या जन्मजात ह्दयव्यंग (-डऊ आणि तडऊ) असणार्‍या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular