सबिना पार्क : वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी आजपासून सुरू होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात डावाने विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामनाही जिंकण्याच्या तयारीत आहे. पहिल्या कसोटीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्टइंडिज संघही तयारीने मैदानात उतरत आहे. वेस्टइंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. तर आर. अश्विनने शतक ठोकतानाच सात बळी घेत ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब पटकावला होता. सबिना पार्कवर दुसरी कसोटी होणार आहे.
भारत वि. वेस्टइंडिज; आज दुसरा कसोटी सामना
RELATED ARTICLES