सातारा : सातारा पंचायत समितीची विशेष सर्वसाधारणण सभा शनिवार दि. 30 जुलै 2016 रोजी दुपारी 1 वाजता पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केल्याची माहिती सभापती सौ कविता चव्हाण यांनी दिली.
या सभेस महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषदेकडून आलेल्या धोरणात्मक आदेशाचे व परिपत्रकाचे वाचन करणे, सातारा पंचायत समिती अंतर्गत विविध कार्यालयातील योजनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहेत. तसेच ऐनवेळी येणार्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. सभेला सर्व विभागाचे अधिकारी, सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपसभापती संजय पवार यांनी केले आहे.
सातारा पंचायत समितीची शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा
RELATED ARTICLES