राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर धुमाळ यांचे निधन

सातारा, दि. २७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जिल्हा सरचिटणीस व पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय सुधीर माधवराव धुमाळ (वय ६९) यांचे आज सोमवारी सकाळी पुणे येथे निधन झाले.
काँग्रेस (एस) पासून शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून पक्षीय पातळीवर अनेक जबाबदाऱ्या धुमाळ यांनी पारपाडल्या. मूळ गाव सोनके (ता. कोरेगाव) असणाऱ्या धुमाळ यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून काम केले।सातारा क्रांती प्रतिष्ठान चे माध्यमातून समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होते. , सातारा ज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.