पुसेगांव : संपूर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थान टस्टची पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन डॉ सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी नागरिक संघटनने आपली सत्ता राखली तर उपसरंपच रणधीर जाधव यांच्या जनशक्ती संघटनेला दोन जागेवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामविकास संघटणेला भोपळा फोडता आला नाही.
खटाव तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टची पंचवार्षिक निवडणुक तीनही संघटनेने प्रतिष्ठेची केल्याने मोठया प्रमाणात चुरस निर्माण झाली शेवटच्या टप्प्यात भष्ट्राचाराचे आरोप करत ग्रामविकास संघटना आणि जनशक्ती संघटने चांगले आव्हाण निर्माण केले होते. पण मतदारांनी या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता डॉ सुरेश जाधव यांच्या पारर्शक नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. नागरिक संघटनेचे माजी चेअरमन सुनिलशेठ जाधव आणि संतोष तारळकर यांना निसटता पराभव स्वीकाराव लागला तर जनशक्तीचे रणधिर जाधव यांना पुसेगावातून उच्चांकी मते मिळली आणि सुरेश जाधव यांना 7 मतांनी धक्कादायक विजय मिळाल्याने ग्रामपंचायतीला झालेल्या पराभवाची भरपाई केल्याची चर्चा जनशक्तीच्या समर्थकांच्यात होती
चेअरमन डॉ सुरेश जाधव यांना 2243 मते मिळाली तर योगश देशमुख 2216, पंचायत समीती सदस्य मोहनराव जाधव यांना 2022 ,खटाव तालुका शिवसेना प्रमुख प्रताप जाधव 2115, यांनी विजय मिळाला तर नागरीक संघटणेचे माजी चेअरमन सुनिलशेठ जाधव 1818 मते आणि संतोष तारळकार यांना 1681 मते मिळाल्याने त्यांना निसटता पराभव पत्कारावा लागला.
जनशक्ती संघटनेचे संस्थापक उपसरपंच रणधीर जाधव यांच्या जनशक्ती संघटनेला दोन जागेवर समाधान मानावे लागले महत्त्वाची बाब म्हणजे जनशक्तीचे प्रमुख रणधिर यांना पुसेगावतुन उच्चांकी मतदान झाले रणधिर जाधव यांच्या पारडयात भरभरून मते टाकल्याने विरोधकांसहीत अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या. सुरेशशेठ जाधव यांना ग्रामपंयातीला प्रमाणे याही वेळी निसटता पराभव पत्कारवा लागला होता पण यावेळी त्यांना 7 मतांनी धक्कादायक विजय मिळाल्याने जनशक्तीला दोन जागा मिळाली रणधिर जाधव यांना 2284,सुरेश जाधव 1825 ,शिवानंद जाधव यांना 1493, प्रविण जाधव यांना 1152, अॅड श्रीनिवास मुळे 1462, सोपान जाधव 999 यांना मते मिळाली
राष्ट्रवादी प्रणित श्री सेवागिरी ग्रामविकास संघटणेला त्यामानाने अपेक्षित यश संपादन करता आले नाही ़ विद्यमान विश्वस्त अॅड विजयराव जाधव यांना 1320, सतिश फडतरे 1220, जगनशेठ जाधव 815,सुसेन जाधव 953,बजिरंग देवकर 957 आणि श्रीकांत जाधव 726 यांना मते मिळाली अपक्ष उमेदवार मिलींद जाधव 335 यांना मते मिळाली.