सातवी हत्या घोटवडेकर हॉस्पिटलच्या वॉर्डबॉयची
सातारा : क्रूरकर्मा डॉक्टर डेथ संतोष पोळने सहा नव्हे तर सात खून केल्याचे स्वतःच कबूल केले आहे. त्याने सातव्या खूनाची कबूली दिली. डॉ. घोटवडेकर हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयची हत्या केल्याचे पोळने मान्य केले आहे. त्यानंतर पोलिसांनी घोटवडेकर हॉस्पिटलची आठ तास कसून चौकशी केली. काही रुम सील करण्यात आल्या आहेत.
वाई आणि परिसरातून गेल्या 13 वर्षात किती लोक बेपत्ता झाले यांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
सुमारे 26 तोळे सोने वाईतील एका सराफाच्या दुकानातून ताब्यात
वाई हत्त्याकांडातील आरोपी संतोष पोळ याने खून केल्यानंतर दागिने चोरी करून विकलेले दागिने आज वाई पोलीसांनी जप्त केले. सुमारे 26 तोळे सोने वाईतील एका सराफाच्या दुकानातून ताब्यात घेण्यात आले. 2003 पासून संतोष पोळ हा खून करून मृतदेहावरील दागिने काढून तो ते दागिने वाई येथील सराफाकडे गहाण ठेवत होता. हत्त्याकांडाची घटना उघडकीस आल्यानंतर संतोष पोळ हा पोलीसांना वेगवेगळे जबाब देवून गुंगारा देत होता. मात्र सोने कोठे ठेवले आहे. याचा खुलासा करत नव्हता. पोलीसांनी वेगवेगळ्या क्लूप्त्या लढवून संतोष पोळ याच्याकडून अपेक्षीत अशी माहिती मिळविली. आज त्याने सोने ज्या सराफाकडे गहाण ठेवले होते त्या सराफाचा पत्ता दिल्याने त्या सराफाकडून 26 तोळे सोने पोलीसांनी हस्तगत केले.