Sunday, March 23, 2025
Homeअर्थविश्वएलआयसीची हिरकमहोत्सवी वाटचाल देशाला अर्पण : गडपायले

एलआयसीची हिरकमहोत्सवी वाटचाल देशाला अर्पण : गडपायले

सातारा : एक सप्टेंबर 2016 रोजी म्हणजे आज एलआयसीच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली. एलआयसीने जिवन विमा जनतेपर्यंत पोहचविताना जनतेची बचत संकलीत करुन जनकल्याणासाठी मोठा निधी उपलब्ध केला. आज एलआयसी आपले हिरक महोत्सवी वर्ष देशाप्रती अर्पन करत आहे अशी माहिती सातारा वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलसीदास गडपायले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा येथे विभागीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, या वर्षी 300 कोटींचे उदिष्ठ पुढे ठेवून 1 लाख 3 हजार विमा धारकांना विमा पॉलीसी दिली जाणार आहे. तसेच वर्षाला 7.50 टक्के गॅरेंटेड रिटर्न देणारी नवीन योजना या वर्षी सुरु केली जात आहे. विमा हप्त्यांची बँकेतून थेट हप्ता भरण्याची सुविधा या महिन्याच्या आठ तारखेपासून सुरु होत आहे. तसेच संस्थेकडून दिली जाणारी सर्व पेमेंट आता एनईएफटीच्या माध्यमातून ग्राहकाच्या बँक खात्यावर भरली जाणार आहे.
1956 मध्ये मात्र रु 5 कोटी भांडवलावर सुरुवात केलेल्या एलआयसी ची आजची संपत्ती 22.10 लाख कोटी पेक्षा जास्त तर लाईफ फंड रु 20 लाख, 57 हजार 625.308 कोटी आहे. स्थापनेवेळी 168 कार्यालये होती त्याची संख्या 4762 असून 33161 संपर्क बिंदू आहेत. 114000 कर्मचारी, अधिकारी, 1061000 विमा प्रतिनिधी आणि 29 कोटी चालू स्थितीतील पॉलिसी असा महामंडळाचा आकार व व्याप्ती आहे. वर्ष 2015-2016 मध्ये एलआयसीने मार्केटमधील हिस्सा पॉलीसीआधारे 76.83 टक्के तर प्रिमियमआधारे 70.44 टक्के राखला आहे. विमेदारांना क्लेम देण्याचे प्रमाण विमा उद्योगातील सर्वोत्तम आहे. 99.75 टक्के मुदतपूर्व आणि 99.49 टक्के मृत्यूदावे.
माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यातही एलआयसी अग्रेसर आहे. एलआयसी गोल्डन ज्युबिली फौंडेशनची स्थापना 2006 ला झाली. ज्याव्दारे दारिद्य्र निवारण शिक्षळाचा विकास, वैद्यकीय मदत, अशाप्रकार गरजूंना एनजीओ माध्यमातून मदत केली जाते. 13 देशामधील शाखा कार्यालयामुळे एलआयसी जागतिक स्तरावरील आर्थिक संस्था बनली आहे. यावर्षी संस्थेला 32 पारितोषिके मिळाली जसे कार्पोरेट गव्हर्नन्ससाठी गोल्डन पिकॉक रिडर्स डायजेस्ट चा ट्रस्टेड ब्रँड तसेच इंडियाज टॉप पीएसयुस 2015 इ. कार्पोरेशनने देशाच्या समृध्दीसाठी 31 मार्च 2016 अखेर रु 1458901 कोटी जनउपयोगी उपक्रमांत गुंतवले आहेत. उदा. वीज, रस्ते, धरणे, बंदर इ. राष्ट्रियीकरणावेळी स्विकारलेली उद्दीष्टे पूर्ण करताना एलआयसीने देशाच्या विकासात मोलाची भुमिका पार पाडली.
विमा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या हस्ते वृक्षारोपण, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रचारफेरीचे उद्घाटन, ग्राहक बैठक, रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांकरीता निबंध व चित्रकला स्पर्धा. रिमांड होममधील विद्यार्थ्यांसाठी भोजन.
आजच्या पत्रकार परिषदेला वरीष्ठ मंडळ प्रबंधक तुलसीदास गडपायले, मार्केटिंग मॅनेजर, उत्पल तरफदार, मॅनेजर सेल्स पवन वर्नवाल तसेच ग्राहक सेवा प्रबंधक पांडूरंग पोटले, मॅनेजर संजय सांगलीकर अपूर्वा रानडे, सुकाळे, पांडे उपस्थित होते. प्रास्ताविक वसंत नलावडे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular