सातारा : येथील निसराळे गावातील सीमा सुरक्षा दलाचे जवान प्रशांत दिनकर पवार यांने स्वत:च्या जवळ असणार्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. छत्तीसगड राज्यातील बांदे (पखनंजोरे) जिल्हा कनकेर येथे सेवा बजावत होते. आत्महत्येचे कारण अजून कळालेले नाही.
जवान प्रशांत पवार यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता निसराळे गावी येणार आहे. जवान प्रशांत पवार यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवान पवार यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ, एक विवाहित बहीण, दोन चुलते, आजी, आजोबा असा परिवार आहे.