सातारा : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्याद्वारे सन 2017-18 या वर्षातील राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन ( 14,17,19 वर्षाखालील मुले व मुली ) क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 नोव्हेंबर 2017 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडासंकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते व श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटना यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी मा. पालकमंत्री विजय शिवतारे हे या स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेतून निवड झालेल्या 17 वर्षाखालील मुला मलींचा महाराष्ट्र राज्य संघ दि. 20 नोव्हेंबर रोजी कडापा येथे होणार्या राष्ट्रीय शालेय बँडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे, अशी माहिती सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांनी दिली आहे.
राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे 9 ते 11 नोव्हेंबर पर्यंत आयोजन
RELATED ARTICLES