म्हसवड : काळचौंडी(ता.माण) येथील भेंडीच्या शेतातील तलावाची मे 2017 या महिन्यात शासनाने सुमारे 17 लाख रुपये खर्च करून गळती काढण्यात आली होती. परंतु ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम करून पैसे लाटले आहेत.सदर कामाची लघुपाटबंधारे विभागाने चौकशी करून कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काळचौंडी येथे भेदाच्या शेतात बांधलेल्या तलावाचा अनेक शेतकर्यांना फायदा होणार होता.परंतु या तलावाला लागलेल्या गळतीमुळे पाणी निघून जात होते.त्यामुळे दरवर्षी शेतकर्यांचे नुकसान होत होते.म्हणून गत मे महिन्यात पावसाळ्या पूर्वी शासनाच्या लघुपाटबंधारे विभागा मार्फत 17 लाख रुपये खर्चून गळती काढायचे काम करून घेण्यात आले. दरम्यान पावसाळ्यात हा तलाव खचाखच पाण्याने भरला होता.
मात्र गळती काढण्याचे काम निकृष्ट झाल्याने आज मितीला तलावात तीस टक्के पाणी शिल्लक राहिले नाही.त्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.17 लाख रुपये खर्चून नक्की ठेकेदाराकडून काय काम झाले असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सदर कामाची लघुपाटबंधारे विभागाने चौकशी करावी व कारवाई करावी. सदर तलावाची गळती थांबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली नाही. चौकशी न झाल्यास व ठेकेदारावर कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा ग्रामस्थांनी दिला आहे.
काळचौंडी येथील तलावाला गळती! ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा!
RELATED ARTICLES