वडूज : सर्वसामान्य जनतेस त्रास देणार्या नोटाबंदी, जी.एस.टी. या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तहसिलदार कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. हुतात्मा स्मारकापासून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिलांनी मोर्चा काढला. प्रारंभी नोटाबंदीच्या निर्णयामुळे जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर नोटांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून नोटाबंदीचे श्राध्द घालण्यात आले. या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. कविता म्हेत्रे, तालुकाध्यक्षा रेश्मा तानवडे, शारदा भस्मे, शबाना मुल्ला, दैवशिला धपाटे, अनुराधा आवळे, कल्पना कुंभार, स्वाती पाटोळे, नंदा पाटील, मनिषा पाटोळे, बसंती माने, शशिकला गाडवे, रेश्मा सातपुते, वंदना हिरवे, आशालता चव्हाण, मनिषा पाटोळे, स्नेहलता कुलकर्णी आदिंनी सहभाग घेतला.
वडूजला नोटाबंदी व जीएसटी विरोधात राष्ट्रवादी महिलांचे आंदोलन
RELATED ARTICLES