सातारा :तडवळे ता. कोरेगाव येथील 6 वर्षीय बालिकेवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केला आहे. या पिडीत मुलीच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्हे आज सातार्यात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना नराधम आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दोन दिवसापूर्वी संतोष भोईटे वय 45 याने पिडीत 6 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना तिला फरफटत नेऊन घराच्या पाठीमागे असणार्या शेडमध्ये अत्याचार केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर सातारा जिल्ह्यात खळबळ माजली होती. गेल्या दोन दिवसात अनेक पक्षाचे पदाधिकारी, व संघटनांचे कार्यकर्ते पिडीत मुलीच्या आई-वडिलांना जिल्हा रूग्णालयात भेटून त्यांचे सांत्वन करीत आहेत. आज शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोर्हे सातार्यात येवून जिल्हा रूग्णालयात जाऊन पिडीत मुलीच्या आई-वडिलांची भेट घेवून त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे सांगितले यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचेकडून पिडीत मुलीच्या तब्बेतीची चौकशी केली. बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. शासन अशा आरोपींना फाशीपर्यंत कसे पोहचवता येईल याचा प्रयत्न करेल. या घटनेतील आरोपी अत्यंत कोडगेपणाने अत्याचार करूनसुध्दा गावात वावरत होता. मी नुकतीच जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेतली. जिल्हा पोलीस प्रमुखांनी 15 दिवसाच्या आत आरोपी विरोधात दोषारोप पत्र सादर केले आहे असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा निकाल सहा महिन्याच्या आत लागू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही न्यायालयाला विनंती करणार आहे की, या केसमध्ये मुलीची किंवा तिच्या कुटुंबियांची कुठेही ओळख पटू नये यासाठी ही केस गोपनिय ठेवण्यात यावी. गावातील लोकांनी सुसंस्कृतपणे वागले पाहिजे. सगळेच लोक वाईट नसतात असे त्यांनी यावेळी नमुद केले. शाहु, फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचा वारसा चालवायचा असेल तर सर्व राजकीय पक्षांनी अशा घटनात एकत्र आले पाहिजे. अत्याचार झालेल्या पिडीत महिला, मुली असतील यांना धीर देणेेचे काम गरजेचे आहे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे आहे. यासाठी गावातील लोकांनी त्यांना घटनेची चर्चा करून दुखवू नये. महाराष्ट्रात तसेच सातार्यात काही प्रलंबीत केसेस संदर्भात गृहराज्यमंत्री यांची आम्ही भेट घेवून या केसेस लवकरात लवकर सोडवाव्या अशी मागणी करणार आहे. यावेळी सातार्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला, कार्यकर्ते उपस्थित होते.
पिडीत मुलीच्या कुटुंबियांची निलम गोर्हेंकडून चौकशी
RELATED ARTICLES