सातारा : राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत राज्य शासन पाणी पुरवठा विभागाला यंदाच्या वर्षी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणार आहे. शासन उपलब्ध करुन देणा-या निधीतून पाटण तालुक्यातील आमदार शंभूराज देसाईंनी मागणी केलेल्या डोंगरी आणि दुर्गम भागातील नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावा अशा सुचना पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांना दिल्या असून पाटण तालुक्यातील विशेष घटक योजनेतंर्गत तसेच भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणातंर्गत सुचविलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांनाही निधी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दि.11 डिसेंबर रोजी नागपुर याठिकाणी पाटण तालुक्यातील राष्ट्रीय पेजजल योजनेतंर्गत, विशेष घटक योजनेतंर्गत तसेच भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणातंर्गत आराखडयात समाविष्ट असलेल्या डोंगरी आणि दुर्गम भागातील नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांचेबरोबर या विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांची पार्श्वभूमि प्रथमत: बैठकीमध्ये पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेपुढे मांडली आमदार शंभूराज देसाई यांचे माहितीला दुजोरा देत पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यातील प्रलंबीत असणा-या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसंदर्भात आमदार शंभूराज देसाई हे सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री व माझेकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांचा भाग डोंगरी आणि दुर्गम आहे आमदार देसाई जी वस्तूस्थिती सांगत आहेत ती योग्य असून त्यांच्या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेसंदर्भात सातत्याने चर्चा देखील झाली आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनीही सुचना देखील केल्या आहेत.असे सांगत पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रीय पेजजल योजनेतंर्गत राज्य शासन पाणी पुरवठा विभागाला आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणार आहे. शासन उपलब्ध करुन देणा-या निधीतून पाटण तालुक्यातील आमदार शंभूराज देसाईंनी मागणी केलेल्या डोंगरी आणि दुर्गम भागातील नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी प्राधान्याने उपलब्ध करुन दयावा असे सांगत राष्ट्रीय पेजजल योजनेतंर्गत जानेवारी 2018 मध्ये पहिल्या टप्प्यात आमदार शंभूराज देसाईंनी सुचविलेल्या कामांना निधी उपलब्ध करुन देणेबाबत ना.बबनराव लोणीकर यांनी अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल यांना आदेश दिले तसेच पाटण तालुक्यातील विशेष घटक योजनेतंर्गत तसेच भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणातंर्गत सुचविलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांनाही प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देवून ही कामे हाती घेणे बाबतच्या सुचना मंत्री यांनी सचिव व उपस्थित अधिका-यांना दिल्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाटण तालुक्यातील प्रलंबीत राहिलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेंच्या कामांना राष्ट्रीय पेजजल योजनेतंर्गत, विशेष घटक योजनेतंर्गत तसेच भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणातंर्गत प्राधान्याने निधी उपलब्ध करुन देणेबाबत पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी धोरणात्मक निर्णय घेवून हा निधी जानेवारी 2018 पर्यंत पहिल्या टप्प्यात देवून ही कामे हाती घेणेबाबत सुचना झाल्याने आमदार शंभूराज देसाईंनी पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे आभार व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करुन द्या , पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर यांच्या पा.पु.सचिवांना सुचना ; आ. शंभूराज देसाईंचा सातत्याचा पाठपुरावा
RELATED ARTICLES