सातारा/कराड : सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रूग्णालय, कराड येथील रूग्णांना पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस श्री अविनाश मोहिते, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ.शालन माळी, कराड-उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पाटीैचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराड शहर अध्यक्ष, नंदकुमार बटाणे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संजय जगदाळे, सह्या्द्रिचे संचालक महादेव वाघमारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीैचे सरचिटणीस श्री महंमद आवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीैचे जिल्हा प्रतिनिधी मज्जीद आंबेकरी, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कराड शहर सरचिटणीस प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पाटीैचे संपर्क प्रमुख सुहेल बारस्कर, शशिकांत पोळ, माजी नगरसेवक, रमेश जाधव, संजय मोहिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कराड तालुका अध्यक्ष सतीश भोगांळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्यास अध्यक्ष कराड शहर प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन मुल्ला, रणजीत पाटील, अक्षय महाडीक व मान्यवर उपस्थित होते.
सताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये केक कापण्याात आला. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अमृता पाटील, सुधीर धुमाळ, दत्ता नाना उत्तेकर, राजेंद्र लवंगारे, शफीक शेख, कुसुम भोसले, अतुल चव्हाण, बाळासाहेब महामुलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस केक कापून साजरा ; तर कराड येथे रूग्णांना फळे वाटप
RELATED ARTICLES