जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय रायफलच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला आहे.
भारतीय जवानांकडूनही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दोन्ही बाजूकडून जोरदार गोळीबार झाला असून ४ ते ५ दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.
सर्जिकल स्ट्राईकपूर्वीच दहशतवाद्यांचा जथ्था भारतात घुसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. उरी हल्ल्यात सहभागी झालेल्या घुसखोरांचा हा दुसरा ग्रुप असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये दहशतवादी हल्ला
RELATED ARTICLES