न भूतो न भविष्यती असा मूकमोर्चा ठरला अचंबित करणारा; स्वयंसेवकांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन
सातारा : मराठा आरक्षणासह अनेक मुद्दे हाती घेउन कोपर्डी बलात्कारातील दोषींना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अट्रॉसिटी कायद्यात बदल करावेत अशा विविध मागण्यांसाठी आज सातारा शहरात संपुर्ण जिल्ह्यातुच नव्हेत राजधानी साताराचे महत्व लक्षात घेत आज परजिल्हा आणि परराज्यातुनही आलेल्या लाखो मराठा तसेच अनेक इतर जातीच्या बंधू भगिनींंनी केलेला एल्गार हा जरी मूक असला तरी त्याची दाहकता ही अनपेक्षित अशीच होती.
सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या मेैदानावरुन निघालेला हा तब्बल आठ किलोमीटर लांबीचा मूक मोर्चा हा खर्या अर्थाने सातारा शहराने प्रथमच आजमावला. गेले 2 दिवस संपुर्ण सातारा शहर हे भगवे झाल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा हातात भगवा ध्वज, डोक्यावर मी मराठाची टोपी आणि अंगात घातलेला भगवा किंवा काळ्या रंगाचा टीशर्ट पाहता सारे वातावरणच भगवे होउन गेले होते.
मागील 3 दिवस सर्वत्र भगवे ध्वज, कमानी, दुचाकी-चारचाकी वाहनांच्या भव्यदिव्य रॅली यामुळे अवघे वातावरण मराठामय होऊन गेलेहोत. आज सोमवारी जरी हा मोर्चा झाला तरी रविवारी सायंकाळ पासूच हातात भगवे ध्वज घेत आणि सुसाट वार्याच्या वेगाने शहर परिसरात दुचाकीवर दौडणारे नव्या युगातले मावळे दिसून येत होते.
आज पहाटे पासूनच जिल्हा परिषद मैेदानावर हे मावळे गोळा होण्यास सुवात झाली होती. त्यामुळे शहराच्या आठही बाजूनी येणार सर्व वाहनांचे रस्ते हे आज दुपारपयर्ंत पुर्णत: बंद करण्यात आले होते. आज शहरात येणारे जीवनावश्यक दुध, भाजीपाला, फुले ही येउ शकली नाहीत. आज मोर्चाचा मार्ग हा पहाटे पासून स्वच्छ आणि वाहन विरहीत करण्यात आला होता. वाहतूक शाखेच्या वतीने पुर्ण रस्ता भर माईकवरुन पुकारा करीत खासगी लावण्यात आलेली वाहने दुर करण्यात आली तसेच अनेकांनी जी वाहने जागेवरच ठेवली होती त्यांना क्रेन आणून ती टो करत वाहतूक शाखेच्या पार्कींग मध्ये नेण्यात आलीं.
आज पहाटे पालिकेच्या आरोग्य विभागाने राजपथावर काडी कचरा दिसणार नाही ही दक्षता घेत परीसर स्वच्छ ठेवला आणि जंतुनाशक पावडरीची फवारणी केली. प्रत्येक चोैकात महिला तसेच पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याने सकाळपासूनच मोर्चा मार्गावर एक शिस्त जाणवत होती.
सकाळी आठपासूनच शहरातील प्रमुख मार्गावर तरुण युवक युवतींची गर्दी होउ लागली होती.
शहरातील उपनगर तसेच अनेक लगतच्या गावातून येणार्या मोर्चेकर्यांची संख्या जास्त असल्याने या सर्व आंदोलकांना मोर्चासाठी पायीच सुमारे 2 ते3 किलोमीटरची पायपीट करत यावे लागले. शहरातील मोर्चामार्गावर सुमारे प्रत्येक 100 मीटर अंतरावर एलईडी लावण्यात आले होते. त्यातून मोर्चाची सद्यस्थिती आणि सहभागींना आजमावता येत होते.
पोवइर्ंनाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास आकर्षक फुलांची सजावट केल्याने हे रुप डोळयात आणि कॅमेर्यात साठवण्यासाठी हजारोंची गर्दी होत होती.तसेच आकाशवाणीवरुन मोर्चाची लाईव्ह कॉमेंट्री आणि सूचना दिल्या जात होत्या.
आबाल वृध्दांनाही या मोर्चाचे तेवढेच आकर्षण असल्याने अनेक लहान मुलांनी वडिलांच्या खांद्यावर बसून हातात भगवा ध्वज फिरवत मोर्चात सामील होण्याची आपली हौस भागवून घेतली. अनेक महिलांनी खास या मोर्चाचे साठी भगव्या साड्या आणि डोक्यावर टोप्या घालत मोर्चात सहभाग घेतला.
शहरातील मोर्चामार्गावर अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देणारे फलक तसेच भव्य कमानी उभारुन या मोर्चाला पाठिंबा दिला. शहरातील कमानी हौदाजवळ मुस्लीम बांधवांनीही विशेष स्वागत कक्ष उभारुन मोंर्चातील आंदोलकांना पाठिंबा दिला.
या मोर्चासाठी येणार्या प्रत्येक मोर्चेकर्याच्या हातात पाण्याची बाटली व तीही घरुन आणलेली दिसून येत होती.
दुपारी 12 वाजता या मोर्चाला जिल्हा परिषद मैदानावरुन प्रारंभ झाला. त्यानंतर हा मोर्चा राधिका रोड मार्गेे प्रतापगंज पेठेतुन मोतीचोक मार्गे राजपथावरुन पालिका मुख्यालयावरुन पोवई नाका येथे आला. शिवतीर्थावर लाखो मराठा बाधवांनी यावेळी एकच गर्दी केली होती.त्यानंतर पाच युवतींकडून या मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आले.
हा मोर्चा नेता विरहीत असल्याने या मोचार्ंंत आज पालकमंत्री विजय शिवतारे, सातारचे खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले ,श्री.छ.सौ.दमयंतीराजे भोसले,आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, श्री. छ. सौ.वेदांतिकाराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही सामील झालें होते.
आज पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मोर्चापुर्वी शहरातील जिल्हा परिषद मेैदान , पोवई नाका, गांधी मैदान येंथे भेट देउन परिस्थितीची पहाणी केली तसेच मोर्चाचा आढावा घतेला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपअधीक्षक विष्णू पवार त्यांचे समावेत होते. ,
मुंबईमध्ये असणारे चाकरमानीही या ऐतिहासिक मोर्चात सामिल होण्यासाठी शेकडो ट्रॅव्हल्समधून दाखल झाले होते.. त्यासाठी व्हॉटसअॅपद्वारे नियोजन होते.. नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत स्थायिक असणारे हजारो सातारकर ट्रॅव्हल्स-ट्रॅक्स घेऊन सातार्यात आले यामध्ये जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील परळी खोर्यासह वाई, जावली, महाबळेश्वर, पाटण, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील असंख्य लोक रोजगार, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक ,जावली, पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य तरुण मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करतात त्याचप्रमाणे कापड दुकाने, रंगकाम आदी विविध क्षेत्रात अनेक तालुक्यातील तरुण कार्यरत आहेत. या सर्वांनी शनिवार, रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारची सुट्टी घेऊन आपला सहभाग नोंदवत मराठा मोर्चा यशस्वी केला.
सातार्यात आज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला लाखो लोक सहभागी होणार असल्याने पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन मोर्चासाठी येणार्या वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आली होती तसेच खेडशिवापूर, आनेवाडी, तासवडे, किणी या टोलनाक्यांवर वाहने खुली सोडली गेली.
मराठा क्रांती मोर्चासाठी सातारा शहर व परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले होते. जिल्ह्यातील कराड, पाटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली, तालुक्यातील मराठा समाजबांधव हे महामार्गावरून सातार्यात दाखल झाल्याने वाहनांची संख्या लक्षात घेऊन कराड व खंडाळा बाजूकडून येणार्या वाहनांसाठी महामार्गाची पश्चिम बाजू राखीव ठेवण्यात आली होती. तसेच रविवारी रात्री 12 वाजता पोलिस बंदोबस्त लावण्यात आला तर सकाळी 7 वाजता मोर्चाव्यतिरिक्त येेणार्या वाहनांसाठी बंदी घालण्यात आली .
कराड व पाटण बाजूकडून येणारे मोर्चेकरी हे शिवराज पेट्रोलपंप व हॉटेल मराठा पॅलेसमार्गे सातार्यात दाखल झाले.. खंडाळा, वाई, महाबळेश्वर व पुणे बाजूकडून येणारी वाहने लिंबखिंडमार्गे शहरात आली. त्यामुळे पोलिसांनी लिंब खिंड, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप, शेंद्रे फाटा या ठिकाणी बॅरिकेटस् सज्ज ठेवले होते. तसेच आज सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून एस. टी. बसेसना सातार्यात एंट्री नव्हती आणि 10 च्या आत मोर्चाला जायचे असल्याने अनेकांनी रात्रीच सातार्यात मुक्काम ठोकला होता.
शहरातील जिल्हा परिषद मैदान, सैनिक स्कूल मैदान, पोलिस परेड ग्राऊंड, कोटेश्वर मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, गांधी मैदान, तालीम संघ मैदान इत्यादी मेैदानावर पार्कींग करण्यात आले होते.तसेच वॉकीटॉकीचा वापर केला गेला.
मोर्चावेळी वैद्यकीय सेवा जलदगतीने मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून 10 अॅम्ब्युलन्स, 10 वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होते, तसेच अग्निशमन दलाची व्यवस्था केली गेली होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांऐवजी पोलिसांची अतिरिक्त कुमक यावेळी हजर होती.
सातारा शहरातील हा मोर्चा इतका अभूत पुर्व होता की ज्यावेळी दुपारी साडेबारा वाजता मोर्चातील पहिली महिलांची फळी ही राजपथावर होती त्यावेळेस मोर्चात सहभागी होउ इच्छिणार्या लाखो महिला या जि.प. मैदानवरच बसून होत्या या शिवाय कोटेश्वर मैदान, गांधी मैदान येथील महिला तसेच मोर्चेकरीही बाहेर पडू शकले नव्हते. तसेच अनेक टोलनाक्यावरही वाहने अडकून पडल्याने लवकर निघूनही मोचार्ंत सहभागी होण्यार्या अनेक मराठा बंधू भगिनींना ताटकळावे लागत होते.
पत्रकारांसाठी घालून देण्यात आलेल्या पोवईनाका येथील खास मचाणावर पत्रकाराशिवाय अनेकांची भाउ गर्दी होत असल्याने अनेकदा संयोजकांनी पत्रकारांशिवाय येथे बसू नका, अन्यथा स्टेज मोडेल अशी तंबी ही देण्यात येत होती. (पान 3 वर)
गेले 2 दिवस पावसाने कहर केला असला तरी केवळ आज मोर्चा वेळी शिडकावा होत या मोर्चाला निसगोंनही जणू पाठींबाच दिला असल्याचे दिसून येत होते.
सहभागी होणार्या लोकांची गैरसोय होवू नये यासाठी मोर्चामार्गावर 4 हजार 500 स्वयंसेवक होते. तर पार्किंगच्या ठिकाणी 800 स्वयंसेवक पुरवले गेले होते.
सातारा शहरातील राजवाडा येथे गोल बाग मित्र समुहाने शिवरायांचे आकर्षक कटआउट उभारुन सुरेख सजावट केली होती.या ठिकाणी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या या नजरेत भरत होत्या.
पाच मराठा कन्यांतर्फे मागण्यांचे निवेदन
मोर्चाच्यावतीने फेटाधारी नउुवारी साडीतील पाच मराठा कन्यांतर्फे मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाकडून जिल्हाधकिारी अश्विन मुदगल यांना देण्यात आले. तसेच .या निवेदनाचे वाचन स्पीकरवरुन केले गेले. जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाची माहिती मोर्चातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या स्क्रीन ठिकठिकाणी उभारण्यात आली होती.तसेच या सर्व मोर्चाचे छायाचित्रीकरण 14 ड्रोन कॅमेर्याच्या माध्यमातून केले गेले.अनेक युवकांनी हातात आपल्या मागण्याचे फलक हातात घेउन खर्या अर्थान ेहा मोर्चा मूक असल्याची भावना करुन दिली. हा मार्चा शहरातील मार्गावरुन जात असताना यावेणॅ लाखो नागरीकांनी आपणही तुमच्या साबेत आहोत या भावनेनेच या मोर्चेकर्यांचा उत्साह वाढवला.
सातार्याच्या गल्लीबोळात निरव शांतता.. मोर्चाचा आजचा दिवस हा सातारा शहरातील मोर्चाचा भाग आणि मार्ग वगळता अगदी सनुना सुना आणि स्मशान शातंतेची जाणीव करुन देत होता. हा मोर्चा मूक असल्याने केवळ संयोजकांच्या लाउइ स्पीकरवरील मार्गदर्शन आणि सूचनांशिवाय खर्या आर्थने अगदी मूक वाटत होता. प्रमुख मार्ग बंद केल असले तरी गल्ल्ीा आणि बोळातून वाहन चालक येजा करत होते. मात्र दुकाने बद, घरे बंद अशी भयाण शांतता या मोंर्चाच्या मागणीची संवेदनशीलता अधिक गडदपणे जाणवून देत होते
शहरात मोंर्चा झाल्यावर अनेक स्वयंसेवकांनी मोर्चामार्गावर झालेला कचरा स्वयंस्फूर्तिने गोळा करत परिसर साफ केला.
अपघाताचे गालबोट..सातारा येथील मोर्चाला येणार्या मोर्चेकर्यानंा लिंबखिंड परिसरात अपघात होउन या अपघातात 3 जण जखमी झाले , हे युवक गौरी शंकर शिक्षण संस्थेतील असून पलटी झालेलवी गाडी ही जिप्सी आहे. तर आणखी एाक दुचाकी स्वाराचा झेंडा हा गाडीच्या चाकात अडकून हा युवक जखमी झाला.
शहरातील देवी मंदिरातही मूक मोर्चासाठी विशेेष पुजा.
सातारा येथे सुरु असलल्ेया मोचार्ंला पाठीबंा देण्यासाठी कृतीतीून अनेक घटना साकारल्या गेल्या, यामध्ये विशेष लक्षीणीय अश्या सातारच्या पंचपाळे हौद दुर्गामाता मंदिरात आज नवरात्री निम्तित तुळजा भवानी देवी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असणारी अतिशय रेखीव आणि विशेष पुजा साकारत या मोर्चाला आपलाही अशिवार्ंद असल्याचे दाखवून दिले.
मोबाईल झाले जॅम..शहरातुन हा मोर्चापढे सरकत असताना मोबाईल नेटवकर्ं जाम झाल्याने अनेकांची मोठी पंचाईत झाली.
मोर्चासाठी 1 पालीस अधिक्षक , 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 9 डीवाय एसी, 9 उप अधिक्षक, 106 पालीस निरीक्षक, 90 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 2086 कमंचारी असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.