महाबळेश्वर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे व चिरंजीव युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे आणि इतर मोजक्या नातेवाईकांसह महाबळेश्वर येथे आज दुपारी दाखल झाले आहेत. नेहमी प्रमाणे महाबळेश्वर येथील सर्वांत उंच ठिकाणी असलेल्या उद्योगपती अविनाश भोसले यांच्या फोर ओक्स या बंगल्या मध्ये त्यांचे वास्तव्य राहणार आहे. महाबळेश्वरला सध्या कडाक्याच्या थंडीने गोठले असून गेली दोन दिवस रोज वेण्णालेक परिसरात थंडीमुळे दवबिंदु गोठतात.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अलिकडेच अयोध्या येथील राम मंदीराचा मुद्दा उचलुन धरला आहे. यासाठी त्यांनी अयोध्या व त्या पाठोपाठ महाराष्ट्राची पंढरी पंढरपुर येथे जाहीर सभा घेवुन शिवसेनेची पहले मंदीर फिर सरकार ही भुमिका ठासुन मांडली या भुमिकेला चांगला प्रतिसाद देखिल मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास दुणावला आहे. अयोध्या असो अथवा पंढरपुर येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेवर टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. ठाकरे यांनी मोदी यांची तलुना कुंभकर्णा बरोबर केली. या टिकेमुळे भाजपा चांगलीच दुखवली गेली पुर्वी ठाकरे यांच्या टिकेला भाजपाचे नेते उत्तर देत होते परंतु आगामी निवडणुकीत युती करण्या बाबत भाजपाने शिवसेनेला गृहीत धरले असून या अशा वेळी शिवसेनेला दुखाविण्याची इच्छा भाजपा मधील कोणाचीही नाही असली तरी वरीष्ठ पातळी वरून कोणीही शिवसेनेवर जाहीर टिका करू नये अशी सक्त ताकिद देण्यात आल्याने अयोध्या व पंढरपुर येथे मोदी यांचेवर ठाकरे यांनी केलेल्या टिकेला कोणीही जाहीर उत्तर दिले नाही सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी राज्यातील भाजपाची झाली आहे.
अयोध्या असो अथवा पंढरपुर असो लाखोंच्या सभासाठी ठाकरे हे आपल्या कुटूंबासह दौरा करतात अशा व्यक्त कार्यक्रमामुळे ठाकरे कुटूंबावर ताण आला असून त्यांनी या व्यस्त कार्यक्रमातुन वेळ काढुन विश्रांतीसाठी महाबळेश्वर गाठले आहे. आपल्या तीन दिवसांच्या या दौर्यात ते नविन वर्षाचे स्वागतही करतील पुढील वर्षी लोकसभे पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहेत. या लागोपाठ आलेल्या निवडणुकांमुळे पुढील वर्षी त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळणे कठीण आहे म्हणुनच नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने विश्रांतीसाठी त्यांनी महाबळेश्वरला राहणे पसंत केले आहे.
विश्रांतीसाठी ठाकरे कुटूंब हे महाबळेश्वरलाच पसंती देते या मागे एक खास कारणही सांगितले जाते 2001 साली महाबळेश्वर येथील हॉटेल ड्रीमलॅण्ड येथील सभागृहात शिवसेनेचे विशेष अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनास पक्षांतील सर्व धुरंधर नेते उपस्थित होते. महाबळेश्वर येथील अधिवेशनाचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार म्हणून पक्षात उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांची नावे स्पर्धेत होती पंरतु अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या गळात पडली ती महाबळेश्वर येथील विशेष अधिवेशनातच त्यामुळे शिवसेनेच्या इतिहातसात महाबळेश्वर शहरास अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे महाबळेश्वरवर विशेष प्रेम आहे आणि त्या मुळेच ठाकरे हे महाबळेश्वर येथे चांगलेच रमतात आणि म्हणुनच वर्षातुन एकदा तरी ते महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी येतातच तीन दिवसांच्या विश्रांती नंतर आगामी निवडणुकात शिवसेनेची ही तोफ राज्यभर धडाडणार असून त्यासाठी लागणारी उर्जा ते या विश्रांती दरम्यान गोळा करणार आहेत. तीन दिवसात ठराविक मित्रांव्यतिरिक्त ते कोणालाही भेटणार नाहीत अशी माहीती शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी येथे दिली.
उध्दव ठाकरे कुटूंबांसह विश्रांतीसाठी महाबळेश्वरात दाखल
RELATED ARTICLES