सातारा : सातारा फलटण रोडवरील कूपर कॉलनी जवळील कण्हेर कॅनॉल पूल धोकादायक स्थितीत आहे. या पलाची तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पहाणी करुन धोकादायक पूलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
सातारा-फलटण रोडवरील कूपर कॉलनीजवळ कालव्यावरील पूलाच्या खांबाचे सिमेंट, दगड कॅनॉलमधील जोरदार वाहत्या पाण्यामुळे पडझड झाली आहे. या पूलावरुन दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरु असते. महामार्गावरून शहारत ये जा करण्यासाठी या रस्त्याचा प्रमुख वापर केला जातो. या पूलाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे .