रहिमतपूर : येथील राधेश्याम मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होवून तीन जण गंभीररित्या जखमी झाले. याबाबतची फिर्याद अशोक बाळकृष्ण फडतरे (रा. मोरगल्ली, रहिमतपूर) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंदविली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 31 डिसेंबर रोजी 2018 रोजी सायंकाळी 4.20 वाजण्याच्या सुमारास आपली पुतणी योगिता हिचा विवाह रहिमतपूर येथील राधेश्याम मंगल कार्यालयात होते. भरत पांडुरंग फडतरे (रा. मोरगल्ली) हे सकाळपासून आपल्या पुतणीच्या लग्न कार्यायाच्या धामधुमीत होते. लग्न समारंभातील जेवण करुन दुपारी ते गावातील घरी काही कामानिमित्त गेले होते. काम उरकून लग्न लावण्यासाठी त्याच्या डिस्कव्हरी मोटारसायकल ( क्र. एम.एच.-11 एई- 5308) ने परत येत असताना कोरेगाव रोडवर राधेश्याम मंगल कार्यालयासमोरुन येणार्या होन्डा एचएफ मोटारसायकल (क्र.एम.एच.-11 सीपी-4260) वरील अज्ञात चालक व श्री. भरत फडतरे यांची समोरासमोर जोरदार धडक होवून अपघात झाला. त्यामध्ये श्री. फडतरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागला तसेच होन्डा दुचाकीवरील अज्ञात चालक व पाठीमागे बसेलला इसम यांनाही अपघातामध्ये मार लागला.
दरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना 108 अम्ब्युलन्सने सातारा येथील सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. असून या अपघातामध्ये दोन्ही मोटारसायकल चे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार उमाकांत नायकवडी हे करीत आहेत.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून तीन जण गंभीर जखमी
RELATED ARTICLES