औंध : राजा श्रीपतराव महाविद्यालय,राजा भगवंतराव ज्यू.काँलेज,श्री.श्री.विद्यालय औंध, विवेकवाहिनी, अंधश्रध्दा निर्मूलन समिती पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी औंध गावातून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला संकल्प रँली काढली यामध्ये नको गुटखा, नको बिअर,हँपी न्यू इयर, हँपी न्यू इयर या घोषणांनी परिसर दणाणून गेला तसेच यावेळी प्लास्टिक निर्मूलन अभियान राबवून श्री.श्री.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी औंध गावात फिरून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, कचरा,बाटल्या गोळा करून सर्वांना प्लास्टिक मुक्तीचा नारा दिला.
येथील नवीन एसटी स्टँड, ग्रामपंचायत चौक, हायस्कूल चौक, होळीचा ठेकेदार चौक मार्गे भव्य रँली काढून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत व्यसना नव्हे तर चांगले विचार, संकल्पांनी करा असे आवाहन केले.
यावेळी विविध प्रकारचे फलक घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर येथील श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाच्या प्रांगणात व्यसनमुक्ती व स्वच्छतेची शपथ सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी घेतली. यावेळी अभिवादन गीत ही सादर करण्यात आले.यावेळी प्रा.बर्गे, तानाजी इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
या अभिनव उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य श्रीकांत भंडारे, एस. बी.कुंभार, एस. बी.घाडगे, एस.व्ही.कुंभार, प्रशांत जाधव, शुभम इनामदार, श्रीपाद सुतार, बाळकृष्ण कुंभार, प्रा.पोळ, प्रा.भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन ए. एम. घार्गे यांनी केले.आभार सी.आर.जाधव यांनी मानले.
नको गुटखा, नको बिअर औंध येथे अडीच हजार विद्यार्थ्यांनी काढली नववर्षाच्या स्वागतासाठी व्यसनमुक्ती रँली.;प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवून दिला स्वच्छतेचा कानमंत्र.
RELATED ARTICLES