म्हसवड : वाकी ता.माण येथील ग्रामस्तांनी वॉटर कप स्पर्धेसाठी कसली असुन गाव व परिसरात पडणारे पावसाचे पाणी जेथे पडेल तेथेच जिरवायचे असा निर्धार केला आहे. कसल्याही परिस्थितीत वॉटर कप स्पर्धा जिंकायचीच असे ठरवुनच संपुर्ण गाव कामाला लागले आहे.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुरेखा माने यांच्या नेतृत्वाखाली काल गावातील सुमारे 350 महिला,पुरुष तसेच शाळकरी मुलांनी उत्स्फूर्तपणे कामाला सुरूवात केली.
प्रारंभी हनुमान मंदिरात सर्वांनी एकत्र येवून विधिवत पूजा केली. त्याचवेळी टिकाव खोरे पाटी या हत्यारांचीही पूजा केली. कृषिसेवक बनसोडे व ग्रामरोजगारसेवक बाबासाहेब साठे यांनी करावयाच्या कामाचे नियोजन सर्वांना सांगितले. यावेळी सरपंच पारुबाई चव्हाण, सोसायटी चेअरमन बाळासाहेब माने, तलाठी रसाळ,वनरक्षक संदिप पवार, पाणी फाऊंडेशनचे अजित पवार,मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
कामाला उत्साहाने सुरुवात करण्यात आली यावेळी सी सी टी दुरूस्तीची तसेच नविन कामे करण्यात आली. पुढील काळात कंपार्टमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कामात शंभुमहादेव हायस्कूल चे विद्यार्थी व शिक्षक, प्राथमिक शाळेचे केशव खाडे व विद्यार्थी तसेच अमोल माने, शंकर माने,दत्तात्रय माने, हणमत चव्हाण,पूजा चव्हाण,वशाली सरतापे, महादेव सरतापे,लतिका साठे यांच्यासह 350 नागरिकांनी सहभाग घेतला.
यापूर्वी वाकी गावाला संत गाडगेमहाराज ग्रामस्वच्छता अभियानात हागणदारीमुक्त गाव म्हणून जिल्हापातळीवरील बक्षिस मिळाले आहे.