Saturday, March 22, 2025
Homeकृषीरासायनिक खते विक्रेते संघटनेची कार्यशाळा सर्वांसाठीच अतिशय मोलाची : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल...

रासायनिक खते विक्रेते संघटनेची कार्यशाळा सर्वांसाठीच अतिशय मोलाची : जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल ; जिल्हास्तरिय कार्यशाळेस विक्रेत्यांची मोठी उपस्थिती

सातारा : समस्त शेतकरी वर्गाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी लागत आहे. शेतीतले नवनवीन प्रयोग करताना शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने मार्गदर्शन आणि माहिती देण्याचे काम हे कृषि सेवा केंदचि करतात. या कृषि केंद्रातून मिळणारे ज्ञानातूनच प्रत्येक शेतकरी हा शिकत जातो. मागील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्युंचे उदाहरण पुढे घेत आज सातारा जिल्याने सर्वप्रथम खते विक्रेतं संघटनेच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिशषद कृषि विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकायर्ंाने घेतलेली ही मार्गदर्शक कार्यशाळा संपुर्ण राज्यात  प्रथमच होत आहे याचा अभिमान वाटतो.अश्या कार्यशाळेच्या उपक्रमातून शेतकरी अधिक सजग आणि प्रशिक्षित होइेल अस उदगार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काढले.
सातारा येथील शाहू कला मंदिरात आयोजीत  रासायनिक खते, बि बियाणे व किटक नाशके विक्रेते संघटनेच्यावतीने किटक नाशके फवारताना विषबाधा होउ नये म्हणुन कोणती काळजी घ्यावयाची या विषयावर आयोजीत  कार्यशाळेत  सिंघल यांनी प्रमुख पाहूणे म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.तसेच , जि.प. मुख्य कायर्ंकारी अधिकारी डॉ. कै लास शिंदे,जिल्हा कृ षि अधिक्षक जितेंद्र शिंदे,  कोल्हापूर येथील कृषि उपसंचालक महावीर जंगटे,जि.प.कृषि सभापती मनोज पवार,  समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगौड,महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, जि. प. कृषि अधिकारी डॉ. चांगदेव बागल, जिप सदस्य डॉ.  शिवाजीराव चव्हाण, खते विक्रेते संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, राजन मामणिया,रणजीत निंबाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देउन करण्यात आला. आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना डॉ. चांगदेव बागल म्हणाले की, किटक नाशके कशी वापरावी याची माहिती आता शेतकर्‍यांबरोबरच शासनाला ही घ्यायची वेळ आली आहे. याबाबत मोठी जागृती झाली आहे. सर्वच शेतकरी हे फवारणी करताना गॉगल, हातमोजे, स्कार्फ , लांब शर्ट घालून फवारणी करतात. मात्र आज ही माहिती सर्वांंना देणे ही काळाची गरज दुकानदारांची आवश्यकता आणि शासनाची जबाबदारी आहे. किडीची पातळी रोखून त्यामुळे आर्थिक नुकसान होउ नये म्हणन शेतकरी फवारणी करतात. सर्वच शेतकर्‍यांना हे ज्ञान मिळावे म्हणुन ही कायंशाळा प्रथम आयोजीत केली आहे. आज प्रशासनाचे सहकार्यांने फवारणीचे कीट हे नाममात्र 50 रुपयात शेतकर्‍यांना दिले जात आहे. तसेच पिक संरक्षण मार्गदशन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येत आहे. फवारणी कशी करावी याचे माहिती फलक आणि जिल्ह्यातील प्रमुख पिकावर पडणार्‍या रोग , किडीची माहिती देणारे अ‍ॅपचाही प्रारंभ होत आहे याचा आनंद वाटतो.
यावेळी विभागीय कृषि सह संचालक महावीर जंगटे यांनी सातारा जिल्ह्यातील शेतकरी हा नेहमीच सर्वात पाउल पुढे टाकत प्रगती करत आहे. व हे काम मी येथे कायर्ंरत असताना जवळून पाहीले आहे.राज्यात कृषि केद्रांनी शेतकर्‍यासाठी केलेला हा उपक्रम प्रथमच पाहतो आहे. एकत्रपणे चांगले काम होईल यासाठी प्रगत शेतीचे ज्ञान आपण सर्वांंनी द्यावे असे आवाहन आपल्या भाषणात केले.
जि.प. मुख्य कायंकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी किटकनाशके वापराच्या अज्ञानामुळे घडलेली दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी सातारा येथे ही कार्यशाळा आयोजित केली आणि त्याला आपण सर्वांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला याचे कातुक वाटते अस सांगुन आज प्रकाशित होणारी पुस्तिका ही केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला उपयुक्त ठरेल असा विश्‍वास वाटतो असे  विचार आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कृषि सभापती मनोज पवार यांनी आपणासवघंना या कार्यशाळेतून मिळालेले ज्ञान हे सर्वदूर पोहचवा, ते झाकून ठेउ नका . शेतकर्‍यानंा खरा सल्ला देणारे कमी आणि नको ते सांगणारे अधिक आहेत.म्हणूनच विक्रेत्यांनीही चूकीची बियाणे, बोगस खते तपासा अधिकृत मालच शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा तसेच गैर काही आढळल्यास अधिकार्‍यांशी तातडीने संपर्क करा, असे आवाहन केले.
जि. प. सदस्य डॉ. शिवाजीराव चव्हाण यांनी, शेतकर्‍यांबाबत यवतमाळ मध्ये घडलेली दुर्घटना ही दुदैव समजावे इतिहासाकडे पाहताना छत्रपती शिवराय हे शेतकर्‍यांचे खरे कैवारी होते व त्यांचे योगदान अलौकीक असल्याने ब्रिटीशांनीही त्यांच्या योजनांचे अनुकरण केल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी शेती तंत्रज्ञानात रासायनीक खतांबरोबरच गोमुत्र, शेण, याासारख्या शेंद्रीय खतांचाही वापर वाढवा अतिशय घातक औषधे व किटकनाशके फवारणी करताना प्रथम माहिती घेवून त्याचा उपयोग करा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यापार्‍यांना व्यापारी दृष्टीकोण व्यापारात ठेवावा लागतो. यात शंका नाही परंंतु व्यापार करताना तत्वाचे पालन करुन तो अधिक यशस्वी होतो असे सांगून ते पुढे म्हणाले की आपला देश कृषीप्रधान असल्याचा देशावर शिक्का आहे आणि तो पुढे ही पुसला जाणार नाही देशात 5ते 10 टक्के लोकच शेतकरी नाहीत शेतीला वातावरण पोषक असल्याने पारंपारीकरित्या सर्वचजण शेतकरी आहेत. शेती हे एक शास्त्र आहे. त्यात संशोधन सुरु असताना शेती करणारे प्रशिक्षीत असतीलच असे नाही स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव नाईक यांच्या काळात देशात सुधारीत वाणे, रासायनीक खते यामध्ये अमुल्य प्रगती झाली. केंद्रीय कृषीमंत्रीपदी शरद पवार साहेब असताना त्यात अधिक वाढ झाली. केवळ सेंद्रीय खतावर भूक भागणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेवून नवे प्रयोग आणि बदलास शेतकरी तयार होवून शेती विकसीत होत आहे. शेती करणार्‍याला आणि धान्य खानार्‍यालाही धोका आहे. तो कमी कसा होईल यासाठी जागृत होणे ही काळाची गरज आहे. व यासाठीच ही कार्यशाळा स्तुत्य आहे.
उद्घाटन सत्रानंतर कार्यशाळेत एक्सेल क्रॉप केअरचे संजय कावंडे गुणनियंत्रक विभागीय कृषी सहसंचालक पंडितराव वाबळे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी डॉ. चांगदेव बागल यांनी विविध विषयांवर विस्तृत मार्गणदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कारंजकर व मोहिम अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी संयोजनासाठी रसायनीक खते विक्रेते संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, राजन मामणीया, रंणजीत निंबाळकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular