महाबळेश्वर : मुख्याधिकारी अमिता दगडे पाटिल व नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या पुढाकाराने केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेसाठी स्वच्छतेसाठी तयारी युध्दपातळीवर सुरु.
केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण 2018 साठी सर्व स्थरावर सरकारने स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेमध्ये महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिकेचा समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पालिकेचे नगरसेवक व सर्व कर्मचार्यांची बैठक आयोजित केली होती. नगरपालिकेच्या कै. भाऊसाहेब माळवदे सभागृहात झालेल्या बैठिकीला उपनगराध्यक्ष अफझल सुतार, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रकाश पाटिल, नगरसेवक संदिप साळुंखे, किसनशेठ शिंदे, कुमार शिंदे, रविंद्र कुंभारदरे, संजय पिसाळ, सुनिल शिंदे, स्नेहल जंगम, श्रद्धा रोकडे, आफरिन वारुणकर, विमलताई पार्टे, विमलताई ओंबळे, शारदा ढाणक आदी उपस्थित होते. दि. 1 नोव्हें पासून स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेसाठी काम सुरु झाले असून साठ दिवसांच्या कालावधीत महाबळेश्वर शहर स्वच्छतेबाबत परिपूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली आहे. या साठ दिवसांच्या कालावधीमध्ये स्वच्छतेबाबत च्या सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करुन शहरातील सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकारण करण्यात येणार आहे. यासाठी कोणती पाऊले पालिकेने उचलने आवश्यक आहेत याबाबत आज पालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी माहिती देताना नगरसेवकांचा व पालिका कर्मचार्यांचा सहभाग कसा महत्वाचा आहे याबाबत मार्गदर्शन केले.
मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी यावेळी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावा व स्वच्छतेच्या या चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहण केले. तसेच विविध वॅार्डांमध्ये स्वच्छतेविषयी प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याचा मानस सांगितला. यावेळी कर्मचार्यांना देखिल कामावर येण्याच्या वेळांवर नियंत्रण ठेवण्यात येणार असून त्याच्या कामाच्या वेळा या पगारपत्रकाशी जोडल्या जाणार असल्याची माहिती दिली. दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन कामाचा आढावा देखिल घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. नागरिकांचा सहभाग याकामासाठी महत्वाचा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यासाठी पालिकेच्या नगरसेवकांनी व कर्मचार्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहण त्यांनी केले. तसेच स्वच्छतेचे मोबाईल अॅप मोठ्या संख्येने नागरिकांनी डाऊनलोड करुन अस्वच्छतेच्या तक्रारी छायाचित्रासह अॅपवरून पालिकेला पाठविण्याचे आवाहन करण्याचे सर्वांना सांगितले. तसेच प्रत्येक सार्वजणिक शौचालयात ग्राहक समाधानी किंवा असमाधानी असलेले समजण्यासाठी स्वतंत्र काम हाती घेण्यात असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी नगरसेवक कुमार शिंदे यांनी नगरसेवकांच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी संपुर्ण सहकार्य करण्याबाबत मुख्याधिकारी यांना नगरसेवकांच्या वतीने ग्वाही दिली. तसेच स्वच्छता कर्मचार्यांसाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत सुझाव दिला. त्यांना स्वच्छता करताना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविण्याबाबत मुख्याधिकारी यांना सांगितले. तसेच शहर स्वच्छतेसाठी आता रोज रात्री 11 वाजता देखिल बाजारपेठेतून कचरा गाडी फिरविण्याचा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सांगितले. तसेच शहरातून स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे यासाठी सर्वांना प्लॉस्टिक बंदी, ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी युध्दपातळीवर काम करण्याचे आवाहन केले.
ओल व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले आहे. जे नागरिक असे करणार नाहीत त्यांचा कचरा पालिका उचलणार नाही याबाबत कर्मचार्यांना सक्त ताकिद देण्यात आली आहे. तसेच हॅाटेल व्यावसायिकांनी देखिल कचर्याचे वर्गिकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवक कुमार शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदीची सक्त कारवाई करण्यात येणार असल्याने पंधरा दिवसात व्यापार्यांनी प्लॅस्टिक पिशव्या संपवाव्यात असे आवाहण केले आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची वेळ दिली जाणार नसून प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याने सर्वांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
महाबळेश्वर स्वच्छ करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु ; प्लॉस्टिक पिशवी वापरण्यास बंदी
RELATED ARTICLES