सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जि.प. सदस्य सुभाष नरळे, मानसिंगराव माळवे, आनंदराव शेळके-पाटील, सौ जयश्री घोडके हे चौघेजण इच्छुक असून विधानसभेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मते अजमाविण्यात आली.
यावेळी आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आ. दिपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ समिन्द्रा जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भोसले, प्रदेश सरचिटणीस गोरखनाथ नलवडे, प्रदेश संघटक बाळासाहेब महामुलकर, पक्षप्रतोद जि.प. सदस्य बाळासाहेब भिलारे, राजेश पाटील- वाठारकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, पक्ष ठरविल त्यालाच जि.प. अध्यक्ष पदावर संधी मिळणार आहे. पक्षाच्या विरोधात काम करणार्या लोकांना संधी दिली जाणार नाही. पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. अध्यक्षपदासाठी वेळ आल्यास निवडणूक होईल. मात्र, सोमवारी सकाळी 10 वाजता जि.प. अध्यक्षांच्या बोलण्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते, नेतेमंडळी यांची बैठक होऊन सभेत पुढील रणनिती ठरविली जाईल.