सातारा येथे दि. 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन,न्यु इंग्लिश स्कूल येथे प्रदर्शनाचे आयोजन, उदघाटनास मान्यवरांची उपस्थिती

साताराः महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राजयविज्ञान शिक्षण संस्था नागपूर, सातारा जि.प. शिक्षण विभाग व येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमानें सातारा येथील न्यु इंग्लिश स्कूलमध्ये 44 वे जिल्हास्तरीय अधिवेशन मंगळवार दि.8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनाची सुरूवात त्याचदिवशी सकाळी 8.30 वा. विज्ञान दिंडीने होणार असून सकाळी 9 वा. उपकरण नोंदणी व मांडणी होवून उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. उदघाटन सोहळयास खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रसिध्द जलतज्ञ डॉ.अविनाश पोळ, शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार असून यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि.प.शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालविकास समिती सभापती सौ. वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड यांचेसह सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, पं.स.सभापती मिलींद कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तीन दिवस चालणार्‍या या भरगच्च विज्ञान प्रदर्शनात विज्ञान उपकरणे, विविध विषयांवर व्याख्याने, व स्लाईड शो, विज्ञानातील चमत्कार व प्रयोग, ई कचरा निर्मुलन व्याख्यान, विज्ञान प्रश्‍नमंजुषा व वर्क्तृत्व स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन यासोबत व्यसनाधिनता टाळणे, पर्यावरणावर व्याख्यान या विषयावर व्याख्यान तसेच शालेय सांस्कृतिक कार्यक्रम,. गीतगायन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
प्रदर्शनाचा समारोप दि.10 रोजी सातारा व जावली तालुंक्याचे आ.श्री.शिवेंद्रराजे भोसले यंाचे प्रमुख उपस्थितीत डॉ. अनिल पाटील, जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे,डे.ए.सोसायटी पुणेच्या नियामक मंडळाचे सदस्य अनंत जोशी यांचेसह जि.प. सदस्या सौ. अनिता चोरगे, सौ.रेश्मा शिंदे, सौ.मधू कांबळे, भाग्यश्री माहितेे, अर्चना देशमुख, मनोज घोरपडे व यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, हणमंतराव जाधव व न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी दिली.