(अजित जगताप)
नैनिताल दि: भारत देशातील देवभूमी असे ज्याचे वर्णन करतात. त्या उत्तराखंड येथील नैनीताल या थंड हवेच्या ठिकाणी आज सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांचे नातू तथा लोकवृत्त वाहिनीचे संपादक सुजित आंबेकर यांच्या हस्ते एल्स कोर्ट या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नैनिताल येथील अनेक बडे अधिकारी, उद्योजक, राजकारणी तसेच देश प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सातारचे सुपुत्र व पत्रकार सुजित आंबेकर यांनी सांगितले की, सध्या राष्ट्राची परिस्थिती ही अनेक संकटातून पुढे चाललेली आहे. देशासमोर बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्था, जातीपातीचा प्रभाव व महिला अत्याचार, गुन्हेगारी वाढत आहे. अर्थकारण, समाजकारण राजकारण व सत्ताकारण अशा जटील समस्या आहेत. आजच्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक भारतीय नागरिकांने या संकटांवर मात करून एकमेकाला साथ देवून पुढे जायची गरज असल्याचे श्री सुजित आंबेकर यावेळी सांगितले. देवभूमी असलेल्या व निसर्गरम्य पर्यटन पर्यटन स्थळ अशी ख्याती असलेल्या नैनीताल या ठिकाणी ध्वजारोहण करून खऱ्या अर्थाने देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहणाचा मान एका महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिल्याबद्दल खऱ्या अर्थाने परिवर्तनाची क्रांती घडलेली आहे.
सातारा जिल्हा हा क्रांतिकारकाचा जिल्हा आहे . या ठिकाणी फुले- शाहू- आंबेडकरांचे विचार देशाला मार्गदर्शक ठरत आहेत. याची चुणूक पाहण्यास मिळाली आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये बातम्यांची देवाण-घेवाण एवढ्या पुरत मर्यादित न राहता समाजाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलणारे पत्रकार सुजित आंबेकर यांचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.
यावेळी मोठ्या संख्येने उत्तराखंड येथील प्रसार माध्यमातील प्रतिनिधी यांनी मोतीचुर लाडू वाटप करून हा आनंद उत्सव साजरा केला.
सदर कार्यक्रमाला उत्तराखंड व नैनीताल येथील राजेश सिंग, सोनम बजवा जतिन बीस्ट ,राजेश्वर दयाल, रामा मेहता, अंकू पांडे, बलराज पसी शेखर पाठक, बी.एम. शहा, गिरीश तिवारी, निर्मल पांडे, सोनिया मिलचेट शैला इराणी आदी मान्यवर उपस्थित होते.
——————————————–
फोटो नैनीताल या ठिकाणी ध्वजारोहण प्रसंगी सुजित आंबेकर व मान्यवर (छाया- अजित जगताप )