जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुढील एक आठवडा औंध येथील श्री भवानी वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी मोफत खुले

औंध(वार्ताहर):- जागतिक वारसा सप्ताहानिमित्त औंध येथील श्री भवानी वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी मंगळवार दि.19ते रविवार दि. 24नोव्हेंबर अखेर मोफत खुले ठेवण्यात येणार आहे अशी माहिती संग्रहालय उपअभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.

पर्यटनाचे महत्त्व वाढावे ,पर्यटक, संशोधक, इतिहास अभ्यासक यांना दुर्मिळ कलाकृती, विविध प्रकारची पेंटिंग्ज, ऐतिहासिक ठेवा, हस्तीदंती ,चंदनी वस्तू
वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स, विविध धातुंमधील दुर्मिळ वस्तू तसेच शिवकालीन वस्तू विविध प्रकारच्या दुर्मिळ ग्रंथसंपदा तसेच अन्य अनेक महत्वाच्या कलाकृती पहाण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी दि.24नोव्हेंबर अखेर खुले ठेवण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा पर्यटकांनी लाभ घेऊन हेरिटेज सप्ताह साजरा करावा असे आवाहन संग्रहालय प्रशासनाने केले आहे.दरम्यान या निमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन संग्रहालयात केले जाणार आहे .