सातार्‍यात राम नवरात्रीनिमित्त चिमणपूरा येथे श्रीराम महायज्ञास सुरुवात

साताराः शहरातील श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळेत श्रृंगेरी येथील शंकराचार्यं महासंस्थान दक्षिणाम्नाय शारदापीठाचे वतीने आयोजीत केलेल्या श्रीराममहायज्ञाची सुरुवात आज शनिवारी गुढी पाडव्याला सकाळी वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मध्वज स्थापना,शांतीसुक्त ,पुण्याहवाचन, गणपती ,वरुण देवता पुजन व प्रधान संकल्प, नांदी श्राध्द , उदकशांत,अग्निमंथन,अग्नि स्थापना, नवग्रह यज्ञ व रामनामाचे महामंत्र हवन करुन झाली. वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबेाले यांच्या प्रमुख संयोजनाखाली हा यज्ञ पुढील 8 दिवस म्हणजे रामनवमी पयर्ंत सुरु रहाणार आहे.वेदमूूर्ती विवेकशास्त्री व सौ.वेदवती गोडबोले यांच्या हस्ते संकल्प करण्यात आला.त्यानंतर पवित्र अग्नी मंथन करुन अग्नी स्थापन करण्यात आला.
तसेच या निमित्त पाठशाळेत विविध धार्मीक, संास्कृतिक कायर्ंक्रमाचे आयोजन करण्यात आलेे आहे. या मध्ये प्रवचन , व्याख्यान, किर्तन, भजन आणि महाआरती तसेच रामनवमीला भव्य शोभायात्रा असे कार्यक्रमाचे आयोजन आहे. अशी माहीती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली. या यज्ञासाठी रत्नागिरी, राजापुर कराड तसेच सातारा येथील एकुण 50 ब्रह्मवृंद सहभागी झाले आहेत. कर्नाटकातील धर्मस्थळ येथील ब्रह्मवृंदही यात सह़भागी झाले आहेत. या यज्ञासाठी पाठशाळेत काढलेल्या महारांगोळ्या, आकर्षक आकाश कंदिलांची केेलेली आरस विशेष लक्षवेधी ठरत आहे.
यावर्षी यज्ञमंडपात आराशीच्या अग्रभागी राम मूर्ती स्थापन केल्या आहेत.तसेच फुलांच्या आकर्षक वेदीवर प्रमुख देवतांची स्थापना,अष्ट दिक्पाल, नवग्रहांची स्थापना केली आहे. महायज्ञाच्या कार्यक्रमात शांतीसुक्त पठण,श्रीमहाविष्णू प्रित्यर्थ पवमान पंचसूक्त स्वाहाकार होणार आहे. शांतीसुक्त पठण,श्री गणपती प्रित्यर्थ गणपती अर्थवशीर्ष स्वाहाकार,भगवती शारदाम्बा प्रित्यर्थ श्रीसुक्त मेधासुक्त स्वाहाकार,महारुद्र हनुमान देवता प्रित्यर्थ मन्यूसूक्त स्वाहाकार,श्रीरामनाम हवन.श्री सूर्यनारायण देवता प्रित्यर्थ सौरसूक्त स्वाहाकार,भवानी शंकर महारुद्र देवता प्रीत्यर्थ लघुरुद्र स्वाहाकार, श्रीरामनाम हवन, शांतुसुक्त पठण,होणार आहे . रविवार दि. 7 रोजी सकाळी 8 ते 1 यावेळेत भगवान सुर्य नारायण प्रीत्यर्थ सौरसुक्त हवन व श्रीराम नामाचे हवन होणार आहे. दुपारी 4 वाजता मुक्ताई मंडळाचे भजन होणार आहे. सोमवार दि. 8 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत भवानी शंकर महाऋद्र देवता प्रीत्यर्थ लघुऋद्र स्वाहाकार व रामनामाचे हवन होवून दुपारी 4 वा. विष्णू कृपा भजनी मंडळाचे भजन होणार आहे. मंगळवार दि. 9 रोजी श्री गणपती प्रीत्यर्थ गणपती अर्थवशीर्ष स्वाहाकार होवून श्रीराम नामाचे हवन होणार आहे. दुपारी 4 वाजता शारदा गणेश मंडळाचे भजन होणार आहे. बुधवार दि. 10 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत महाऋद्र हनुमान देवता प्रीत्यर्थ मन्यूसुक्त स्वाहाकार, महालक्ष्मी प्रीत्यर्थ श्रीसुक्त हवन व श्रीराम नामाचे हवन व दुपारी 4 वा. ओंकार अक्षय भजनी मंडळाचे भजन होणार आहे, गुरुवार दि. 11 रोजी श्री सदगुरु प्रित्यर्थ ब्रम्हा विष्णू महेश सुक्त स्वाहाकार व श्रीराम नाम हवन होवून दुपारी 4 वाजता राधाकृष्ण मंडळाचे भजन होणार आहे. शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत शांती सुक्त पठण आवाहीत देवतांचे पूजन अग्नीध्यान दुर्गासप्तशती पाठ स्वाहाकार व रामनामाचे हवन होवून यज्ञांगभूत दाम्पत्य, कुमारीका सुवासीनी पूजन व श्रीराम सदगुण गौरव सन्मान प्रदान सोहळा होणार आहे. दु. 4 वा. शारदा भजनी मंडळाचे भजन होणार आहे. शनिवार दि. 13 रोजी सकाळी 8 ते 1 या वेळेत प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रीत्यर्थ पुरषसुक्त स्वाहाकार, रामनाम हवन, बलिदान, यज्ञपूर्णाहूती व श्रीराम जन्मकाळाचे किर्तन ह. भ. प. कु. वेदीका विवेक गोडबोले करणार आहे. सायंकाळी 5 वाजता श्रीराम शोभायात्रा यज्ञस्थळापासून काढली जाणार आहे.
महायज्ञ कार्यक्रमात दररोज रात्री 8 वाजता यज्ञ स्थळी महाआरती होणार असून सा. 5.30 ते 8.30 या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार दि. 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान तत्वार्थ रामायण निरुपण सप्ताह आयोजित केला असून वेदमुर्ती विवेकशास्त्री गोडबोले हे निरुपण करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना हार्मोनियम साथ दत्तात्रय डोईफोडे व तबला साथ मिलिंद देवरे यांची असणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान येथील काळाराम मंदीरात राम नवरात्री निमित्त शैलेश केळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली राम यज्ञ सुरु झाला असून उत्सव काळात भजन, रामयज्ञ स्वाहाकार,दासबेाधावर प्रवचन, किर्तन,भक्तीगीतांचा कायर्ंक्रमाची जन्मकाळाचे किर्तन तसेच लळीताचे किर्तनाने14 एप्रिलला रोजी सांगता होणार आहे अशी माहिती मंदिराचे विश्‍वस्त मोहन पुरुषोत्तम शहा ,रविद्र शहा यांनी दिली.
गुढीपाडव्या निमित्त सातारा शहरातील काळाराम, शहाराम, माटेराम, रामध्यान मंदिर, संगम माहुली येथील राम मंदिर, शनिवार पेठेतील गोदावलेकर महाराज साधना मंदिर येथे दर्शनासाठी गर्दी झाली होती.