रहिमतपूर येथे चौडेंश्‍वरी यात्रेनिमित्त खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे हस्ते रथपूजन संपन्न

रहिमतपूर ः रहिमतपूर येथे श्री.चौंडेश्वरी देवी रथोत्सवानिमित्त रथपूजन खा.श्री.छत्रपती उदयनराजे भोसले व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी आनंदा शंकर कोरे ( लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरपरिषद रहिमतपूर), सुनील गुलाबराव माने( जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,उपाध्यक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक), सौ.चित्रलेखा माने -कदम (अध्यक्षा,पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहीमतपूर), भानुदास भोसले (नगराध्यक्ष, नगर परिषद रहिमतपूर),नंदकुमार रामचंद्र माने( सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त, मुंबई),अविनाश माने(माजी नगराध्यक्ष, नगर परिषद, रहिमतपूर), तसेच चौंडेश्वरी देवी मंदिर -मठ विश्वस्त मंडळ , भाविक भक्त व नागरिक उपस्थित होते.