आज दिवसभरात 35 जण कोरोनामुक्त ; यासर्वांना सोडले घरी ; 219 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

सातारा :-   क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण सरुग्णालय, सातारा  येथे दाखल असणारे 5, सह्याद्री हॉस्पिटल येथील 5, कोविड सेंटर रायगांव येथील 2 व खावली येथील 4 असे एकूण  16  कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना  घरी सोडण्यात आले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून आज 19 जणांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आज दिवसभरात एकूण  35 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

219जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीसाठी

            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे  17,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 52, कृष्णा कॉजेल कराड येथे 42, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 14, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 6, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथे 29, ग्रामीण रुग्णालय कोरेगांव येथे 33 व रायगाव येथे 26  असे एकूण 219 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने  एन.सी. सी. एस. पुणे व कृष्णा मेडिकल यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये आज तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 मृत व्यक्तिंच्या घशातील स्त्रावांचाही  समावेश असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.