औंध येथील बँकामधील व्यवहार सलग तिसऱ्या दिवशीही बंद ; वीजेचा खेळखंडोबा सुरूच ; एटीएम सेंटर मध्ये खडखडाट ; नागरिक, ग्राहकांमधून तीव्र संताप

औंध(वार्ताहर):- औंधसह परिसरातील बँकींग व्यवहार सलग तिसऱ्या दिवशी ही बंद राहिल्याने बँक ग्राहक,व्यापारी, शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयांची उलाढाल थांबल्याने नागरिक .व्यापारी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.दरम्यान बँक प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून वरिष्ठ अधिकार्यानी त्वरित लक्ष घालून ग्राहकांना पर्यायी मोबाईल कंंपनीचे नेटवर्क कनेक्शन प्रत्येक बँकेमध्ये उपलब्ध करून द्यावे व हा खेळखंडोबा थांबवावा अशी मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,औंध येथे दोन राष्ट्रीय कूत बँका , व एक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे.
मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता औंध येथील दोन राष्ट्रीयकूत बँकामधील व्यवहार मागील दोन दिवसांपासून इंटरनेट सेवेच्या खेळखंडोब्यामुळे बंद पडले होते. मात्र यामुळे औंधसहपरिसरातील सुमारे पंधरा ते वीस गावातील बँक ग्राहक, व्यापारी, बचत गटाचे सदस्य, नोकरवर्ग,विद्यार्थी,
पेट्रोल पंपचालक,गँस एजन्सी चालक
तसेच अन्य व्यावसायिकांना या बंद पडलेल्या आर्थिक व्यवहारांचा मोठा फटका बसला . अनेक वेळा हेलपाटे मारून ही काही उपयोग नझाल्याने बँक ग्राहकांनी बँक प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र सर्व्हर व इंटरनेट सेवा बंद असल्याने आम्ही काही करू शकत नसल्याचे कर्मचारी, अधिकारी ग्राहकांना सांगत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे आँनलाईन,आरटीजीएस व्यवहार ही खोळंबले होते.
त्यामुळे अनेक मोठ्या व्यापाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान मागील काही दिवसांपासून एटीएम सेवेचा ही शिमगा औंध येथील दोन एटीएम सेंटर्स मध्ये सुरू आहे. त्यामुळे नागरिकांबरोबर भाविक, पर्यटक ही हवालदिल झाले आहेत. तर बुधवारी दिवसभर दुसऱ्या दिवशी वीजेचा खेळखंडोबा सुरूच होता.


एका कंपनीचे इंटरनेट कनेक्शन नीट सेवा देत नसेल
वारंवार सर्व्हर डाऊन होत असेल
तर पर्यायी व्यवस्था औंध मधील सर्व बँकांनी करावी व ग्राहक,विद्यार्थी, शेतकरी महिला बचत गट यांना सुरळीत सेवा द्यावी .याबाबत आपण बँक, दुरध्वनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणणार आहोत व योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.
(संदीप मांडवे माजी सभापती खटाव पंचायत समिती)”