सातारा जिल्ह्यात २८ जून पासून सलून – पार्लर दुकाने चालू करणार ; स्वाभिमानी नाभिक संघटनेचा एल्गार -: जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण

पाटण – कोरानाच्या रोगा मुळे गेली ४ महिने सलुन व पार्लर बंद आहेत त्यामुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत आला आहे. याबाबत मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी, संबधित अधिकारी यांना निवेदन देखील दिले आहेत. निवेदने देऊन १० ते १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी नाभिक समाजाच्या व्यवसायाबाबतीत शासनाने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या संकटाला सामोरे जाताना काही सलून कारागिरांनी आत्महत्या केल्या आहेत. यापुढे आणखी काही दिवस सलून दुकाने बंद राहिल्यास नाभिक समाजात आत्महत्या वाढल्या जातील अशी भिती व्यक्त करून महाराष्ट्रातील नाभिक समाजावर आत्महत्या सारखी वेळ येऊ नये म्हणून स्वाभिमानी नाभिक संघटनेने रविवार दि. २८ जून पासून सलून व पार्लर दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. असे स्वाभिमानी नाभिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी पाटण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातील सलून पार्लर दुकाने उघडण्यास आदेश दिला असल्यामुळे त्यांच्या आदेशावरून सातारा जिल्ह्यातील सलुन पार्लर कारागीर यांच्याकडे पी पी किट (ड्रेसकोड) फेसशिल्ड ग्लास संपूर्ण चेहऱ्यावर मास्क हँडक्लोज सेनिटायजर सोशल डिस्टिंगशन आँपयमेंट घेऊन कस्टमर घ्यावे व येणाऱ्या ग्राहकांचे नाव व मोबाईल नंबर नोंद करून घ्यावे हे सर्व साहित्य ज्या सलून मध्ये कारागिराकडे उपलब्ध असणार आहे त्यांनीच रविवार दि. २८ पासुन सकाळी ९ ते ५ पर्यंत सलुन पार्लर दुकाने उघडावी असे आव्हान असे राज्याध्यक्ष गायकवाड यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सलुन पार्लर दुकाने उघडली जाणार आहेत. असे सातारा जिल्हाध्यक्ष आधिकराव चव्हाण यांनी सांगितले आहे.