सातारा : सातारा येथील सदर बाजार, गोडोली, विसावा नाका, रविवार पेठ, शनिवार पेठ, खण आळी, मोती चौक, प्रतापगंज पेठ, मंगळवार पेठ, आयटीआय रोड अशा साताराच्या चोहोबाजूस व्यवसाय व वास्तव्य असलेल्या, साताऱ्याचे वैभवात आपले योगदान देणाऱ्या जैन समाजाने आज एकत्र येऊन 24 वे जैन तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण महोत्सवाचे अतिशय उत्साहाने व जोश पूर्ण वातावरणात आयोजन केले. सकाळी साडे सात वाजता पोवई नाक्यावरील भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात डॉक्टर विजय शहा म्हसवडकर यांच्या शुभहस्ते जैन ध्वजारोहण, सर्व जैन पंथीयांच्या अध्यक्षां च्या हस्ते रथ पूजन झाल्यानंतर श्री समरथमल जैन, श्वेतांबर जैन मंदिर खण आळी, श्री अजित मुथा, जैन स्थानक , श्री विजय शहा दिगंबर जैन मंदिर, श्री प्रवीण देवी पार्श्वनाथ जैन मंदिर मंगळवार पेठ व श्री सुभाष केसरीमल ओसवाल आयटीआय जैन श्वेतांबर मंदिर या सर्व अध्यक्ष- विश्वस्तांच्या नेतृत्वाखाली जैन समाजातील सर्व पंथीय सदस्यांच्या सहभागाने महा मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूक पोवई नाका,पोलीस हेडक्वार्टर, मल्हारपेठ, शनिवारपेठ, मोती चौक मार्गे खण आळी श्वेतांबर मंदिरापर्यंत सुमारे तीन किलोमीटर अंतर
पार करून विसावली. या महा मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना मास्क वाटप करण्यात आले. या मिरवणुकीचे अग्रभागी श्वेत अश्व, जैन ध्वज, भगवान महावीरांच्या प्रतिमेचा रथ यासह श्वेत वस्त्रधारी लाल फेटा बांधलेले जैन युवक, मध्यभागी चुंदडी पेहेरलेल्या लाल वस्त्रांकित जैन युवती व त्यानंतर रंगीबेरंगी वस्त्रातील महिला यांचे सह हजार हूंन अधिक जैन बंधू-भगिनींचा सहभाग होता. या मिरवणुकीत राजवाडी वस्त्रे धारण केलेल्या राजस्थानी वाद्य वृंदांचा, झांज पथकाचा, पंजाबी ढोल पथकाचा समावेश होता. चौका चौकात जैन महिलांच्या दांडिया नृत्याने व महिला लेझीम पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूस उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांची दाद मिळविली. या मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित असणाऱ्यांसाठी लाडू चे प्रसाद वाटप करण्यात आले. आयटीआय रोडवरील जैन मंदिरात *डॉक्टर उदिता शहा पुणे* यांचे *णमोकार मंत्र हीलिंग* या विषयावर भावपूर्ण व उत्साहवर्धक व्याख्यान झाले. तेथे झालेल्या रक्तदान शिबिरात 100 हून अधिक जैन बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. त्यानंतर सकल जैन संघाच्या सदस्यांनी स्वामीवात्सल्याचा लाभ घेतला . सायंकाळी चार वाजता जैन स्थानकामध्ये महाजपाचे आयोजन केले होते. आशाप्रकारे *भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव* मोठ्या आनंदाने, उत्साहाने, जोशपूर्णरित्या व विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला . यानिमित्ताने शहरातील मुख्य चौकात भगवान महावीरांचे जीवन तत्वांचे, उपदेशाचे फलक लावण्यात आले होते त्यात प्रामुख्याने *जिओ और जिने दो, अहिंसा परमो धर्म, शाकाहार शुद्ध आहार* यांचा समावेश होता.
जंग एक भी लढी नही, फिर भी जग को जीत लिया
अहिंसा, अपरिग्रह, अनेकांत का हमको मंत्र दिया ,
इस जगत तारक महावीर को कोटी कोटी वंदन,
उनकी राह पर चलकर आओ हम भी तोडे भौतिक बंधन!!! या विचाराने सर्व जैन बांधव प्रेरित झाले.
या महामिरवणुकीच्या आयोजनात सकल जैन संघाच्या युवकांचा प्रामुख्याने पुढाकार होता.