मेढा आगारामध्ये मराठी भाषा उत्साहात साजरा

मेढा: येथील राज्य परिवहन महामंडळाचे मेढा आगारामध्ये मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.दरवर्षी कवीवर्य वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे मेढा आगारात मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
आगार व्यवस्थापक श्री. घाडगे यांचे अध्यक्षते खाली तर आ. शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम्.बी. वाघमोडे, उपप्राचार्य प्रा.प्रमोद घाडगे, प्रा. अनंत साठे यांच्या प्रमुख उपस्थीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रथम कुसुमाग्रज यांचे प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी मराठी भाषा संवर्धना बाबत राप कर्मचार्‍यांना, प्रवाशी व विद्यार्थांना मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या हस्ते यावेळी प्रवाशी, विद्यार्थी, विद्यार्थीनीना मराठी पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास एसटी कामगार संघटनेचे नेते शिवाजीराव देशमुख, वेणामाईचे चेअरमन सुरेश पार्टे, राजू आतार, आगारातील कर्मचारी, चालक वाहक , प्रवाशी, विद्यार्थी उपस्थीत होते.
आगार प्रमुख श्री. घाडगे यांनी उपस्थीतांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषणातुन कार्यक्रमाचे महत्व विशद केले तर आभार राजू आतार यांनी मानले.