मेढा प्रतिनिधी – लोणी ता.खटाव येथील सौ.माधुरी सुहास देवकर -चातुर यांनी संदीप युनिव्हर्सिटी नाशिक येथून विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्राप्त केेली.
त्यांनी परफारमन्स अँड इमिशन अनालिसिस ऑफ सीआय इंजिन फ्यूएल विथ वेस्ट कुकिंग ऑइल बाय डिझेल डोफ्ट विथ कॉपर ऑक्साईड नानोऍटेटस या विषयात पदवी प्राप्त केली असून या संशोधन करीता त्यांना डॉक्टर अनिल माहेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्या सध्या जे. एस. पि. एम. इंजिनियरिंग कॉलेज नऱ्हे ( आंबेगाव बु.) येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अधिकारी श्री. निवास देवकर यांच्या त्या सून असून त्यांच्या या यशाबद्दल खटाव – माण चे आमदार जयकुमार गोरे, लोणी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ लोणी तसेच देवकर आणि चातुर कुटुबियांचे निकटवर्तीय यांनी समक्ष भेटून , फोनवर संपर्क साधून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .